सादिक शेख गोंदवले खुर्द (ता. माण) येथील रयत शिक्षण संस्थेच्या गोपालकृष्ण विद्यालयात दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी निर्भया पथकाने विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत विविध महत्वपूर्ण विषयांवर जागृती केली. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन मा. श्री. समीर शेख (पोलिस अधिक्षक, सातारा), मा. श्री. बापू बांगर (अपर पोलिस अधिक्षक, सातारा), मा. अश्विनी शेंडगे (उपविभागीय पोलीस अधिकारी, वडूज), तसेच मा. श्री. अक्षय सोनवणे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, दहिवडी पोलिस ठाणे) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
या प्रसंगी निर्भया पथकातील श्री. सचिन जगताप (पोलीस नाईक), श्री. सागर पोळ (पोलीस कॉन्स्टेबल), श्री. संजय जाधव (पोलीस कॉन्स्टेबल), सौ. सुमाली घाडगे (महिला पोलीस कॉन्स्टेबल), आणि सौ. राजश्री खाडे (महिला पोलीस कॉन्स्टेबल) यांनी विद्यार्थ्यांना टोल फ्री नंबर १०९८, ११२, सखी सावित्री कार्यक्रमांतर्गत दळणवळण उद्बोधन, ट्राफिक शिस्त, बालकांचे गैरवर्तन, पिळवणूक, लैंगिक छळ, शारीरिक गैरवर्तन, मादक पदार्थ सेवन, चांगला व वाईट स्पर्श, भावनिक व मानसिक सुरक्षा, ताणताणाव व्यवस्थापन, विद्यार्थी समुपदेशन, शारीरिक संरक्षण आणि वैयक्तिक सुरक्षिततेचे महत्व या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
गेल्या अनेक वर्षांपासून निर्भया पथक क्र. ५ हे विद्यालये व महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करत आहे. यामध्ये पथकातील सदस्यांनी केलेल्या कामगिरीचे विशेष कौतुक करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्तबद्ध वर्तणूक आणि सुरक्षिततेचे महत्व रूजवले जात आहे. विद्यालयाच्या वतीने या उपक्रमाबद्दल सर्व पोलिस अधिकारी व मार्गदर्शकांचे आभार मानण्यात आले.
व या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. नदाफ एन.डी., आर.एस.पी. तालुका समादेशक श्री. सादिक शेख, श्री. अशोक उगलमोगले, श्री. दिनेश जाधव, श्री. गोपीनाथ घोडके, श्री. प्रमोद माने, सौ. मिनाक्षी शेडगे तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गांचे अभिनंदन करण्यात आले.