**माण-खटाव मतदारसंघ काँग्रेसचाच राहणार: पृथ्वीराज चव्हाण यांचा निर्धार**

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

दहिवडी,  (प्रतिनिधी)

       माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील निवडणूक काँग्रेसच जिंकणार असल्याचा आत्मविश्वास माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना रणजित देशमुख यांच्या विजयासाठी सर्वतोपरी तयारी करण्याचे आवाहन केले आहे.

    काँग्रेस पक्षाच्या बीएलई व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा पिंगळी येथील वैभव मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य रणजितसिंह देशमुख, माजी आमदार रामहरी रुपनवर, राजेंद्र शेलार, माण तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, खटाव तालुकाध्यक्ष डॉ. संतोष गोडसे, प्रा. विश्वंभर बाबर, महिला अध्यक्षा नकुसा जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

    चव्हाण यांनी मित्र पक्षांकडून अपक्ष उमेदवार देण्याबाबत चर्चा झाली होती, पण मतदार संघात परिवर्तनाची गरज असल्याने अपक्ष उमेदवार लढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असे सांगितले. त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करत, “खोके सरकारचे खरे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत,” असा आरोप केला. त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार चोरल्याचेही सांगितले.

     मधुकर भावे यांनी काँग्रेसच्या विचारसरणीचे महत्त्व अधोरेखित करत, “लोकसभेतील निकालाचा प्रभाव विधानसभेतही दिसून येईल,” असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांचे पुतळे वार्‍यामुळे पडल्याचे लाजिरवाणे असल्याचे नमूद केले.

           रणजितसिंह देशमुख यांनी या मतदारसंघात जलसंधारणाच्या कामांचे श्रेय पृथ्वीराज चव्हाण यांना दिले आणि त्यांना खरे जलनायक म्हणून गौरवले. एम. के. भोसले यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. महेश गुरव यांनी सूत्रसंचालन केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!