दिव्यांग आक्रोश मोर्चाला उंब्रज ता कराड विभागातील विविध दिव्यांग संघटनेचा हजेरी लावत पाठिंबा

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

कुलदीप मोहिते
उंब्रज कराड :प्रतिनिधी

       नऊ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर मध्ये झालेल्या आक्रोश मोर्चासाठी उंब्रज मधून प्रहार क्रांती संघटना व जनकल्याण दिव्यांग बहुउद्देशीय विकास संस्था यांचे सर्व पदाधिकारी,, सदस्य व सर्व दिव्यांग बांधव यांनी दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी उंब्रज विभागातून छत्रपती संभाजी नगर येथे बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आक्रोश मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी हजेरी लावली आहे

      छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार बच्चू कडूंच्या नेतृत्वात दिव्यांग आक्रोष मोर्चा नऊ ऑगस्ट रोजी काढण्यात आला होता. दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला गेला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

         या मोर्चाला परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे बच्चू कडू यांनी हा मोर्चा निघणारच असा इशारा दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी नऊ ऑगस्ट रोजी मोर्चा काढला. या मोर्चाला सुरूवात झाली असून मोठ्यासंख्येने शेतकरी, महिला, तरुण आणि दिव्यांग या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्यांचे फलक हातामध्ये घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी मोर्चादरम्यान केली जात होती. जवळपास दीड ते दोन लाख शेतकरी आणि दिव्यांग या मोर्चात सहभागी असल्याचे चित्र यावेळी दिसत होते.

           दरम्यान यावेळी उंब्रज विभागातून प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल कारंडे तालुका अध्यक्ष प्रमोद गायकवाड नियोजक अनिल आटोळे ,अरविंद जाधव, सुनील हजारे, रजत हजारे दिगंबर चव्हाण महेश मोहिते ,साहिल कुरकुटे, प्रवीण जाधव ,विनायक जाधव दिगंबर बांधिर्गे, छायाताई पाटील सोनाली चव्हाण, अण्णासाहेब घाडगे ,सागर स्वामी इत्यादी दिव्यांग सदस्यांनी हजेरी लावली होती


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!