उंब्रज हिंगणोळे येथे एसटी बसची स्टिअरिंग तुटल्याने अपघात झाला. सदर बस चोरजवाडी येथून उंब्रज कडे जात होती. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु यात काही प्रवासी जखमी झाले त्यांना तात्काळ उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रसंगी एसटी बस चालक, वाहक यांची तसेच प्रवाशांची जाऊन भेट घेऊन विचारपूस केली. जखमींना दिलासा देऊन तेथील डॉक्टरांना जखमींवर योग्य ते उपचार करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर लागेल ती मदत करण्याचा विश्वास देखील दिला.
यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, धावरवाडी गावचे सरपंच श्री.नानासो शेळके, ग्रा. प.सदस्य श्री.राहुल कदम यांच्यासह सहकारी मान्यवर उपस्थित होते.