दहिवडी व गोंदवले विभाग शिवसेना ठाकरे गट उपतालुकाप्रमुख पदी दगडू जगदाळे यांची वर्णी
म्हसवड : बिदाल,आंधळी,गोंदवले जि.प.गटांचे दहिवडी विभागाचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख पदी दगडू साहेबराव जगदाळे विद्यमान विभागप्रमुख बिदाल यांची वर्णी लावलेची माहिती माण तालुकाप्रमुख बाळासाहेब मदने यांनी दिली.
पक्षप्रमुख मा.उध्दवजी ठाकरे सो. युवासेनाप्रमुख मा.आदित्यजी ठाकरे सो यांचे आशिर्वादाने व शिवसेना नेते मा. दिवाकरजी रावते, मा.दगडू (दादा) सकपाळ -प.म.समन्वयक व मा.नितीन बानुगडे पाटील संपर्क प्रमुख प.म. यांचे मार्गदर्शनाखाली शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख संजय भोसले यानी सदर निवड केलेचे मदने यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या ग्रा.प.पंचवार्षिक निवडणूकांमध्ये पळशी येथिल निवडणूकीमध्ये अमित कुलकर्णी यांनी भाजपा पुरस्कृत पॅनेलमधून भाजपाचे जिल्हाअध्यक्ष व आमदार जयकुमार गोरे यांचे नेतृत्वाखाली लढवलेली निवडणूक हे शिवसेना पक्षाचे आदेशाचे उल्लंघन व गैरवर्तनूक झालेवरुन अमित कुलकर्णी यांना शिवसेना पक्षाचे पदावरुन कमी केले असलेचे सांगतानाच या पदावरती दगडू जगदाळे यांची वरिष्ठांकडून नेमणूक केल्याचे श्री मदने यांनी सांगितले आहे. यावेळी तालुका संघटक रामचंद्र जगदाळे यांचे हस्ते दगडू जगदाळे यांना पत्र देणेत आले.