म्हसळा नगरपंचायत घन कचरा व्यवस्थापन अंतर्गत आयसीटी बेस प्रणालीच्या अंमलबजावणी सुरुवात

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसळा – सुशील यादव

     राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये घनकचरा संकलन व व्यवस्थापन प्रक्रियेचे प्रभावी सनियंत्रणाकरिता ICT Based प्रणालीच्या बंधनकारक अंमलबजावणीचा निर्णय केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घेण्यात आला आहे.

     घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत दैनंदिन कचरा मॉनिटरिंग साठी म्हसळा शहरात ICT BASED तंत्रज्ञान अमलबजावणी करिता शहरातील मालमत्तावर स्कॅन निहाय कोड लावण्यात येत आहे.नगर पंचायत मार्फत नागरीकांना ओला व सुखा कचरा साठविण्यासाठी देण्यात आलेल्या निळ्या व हिरव्या कचरा कुंड्या वापरतात त्यावर कोड लावण्यात येत आहे.कचरा संकलन कर्मचाऱ्याद्वारे कचरा घेतल्यानंतर कोड स्कॅन केले जाणार असल्याचे मुख्याधिकारी विठ्ठल राठोड यांनी माहिती देताना सांगितले.

       सदरची सेवा पूर्णतः निशुल्क आसुन ह्या तंत्रज्ञानामुळे शहरातील कचरा संकलनाची सेवा अजून चांगली होणार आहे त्यानुषंगाने म्हसळा नगरपंचायत मार्फत कचरा कुंडिवर स्कॅन कोड लावण्यासाठी येणाऱ्या प्रतिनिधींना सहकार्य करावे असे आवाहन मुख्यधिकारी राठोड यांनी केले आहे.लावण्यात आलेला कोड सांभाळून नागरिकांनी
विलगीकृत कचरा गोळा करून स्वच्छता राखणे हि आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.सर्व जन निर्धार करूया,ओला सुखा कचरा वेगवेगळा देऊया असे जाहिर आवाहन म्हसळा नगर पंचायत मार्फत नागरीकांना करण्यात आले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!