व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
गणेश मिंड
इंदापुर प्रतिनिधी दि.17 मे 2014 रोजी मौजे कुंभारगांव येथे महाराष्ट्र शासन कृषि विभागाअंतर्गत खरिप हंगाम पूर्व नियोजन 2024-25 साठी शेतकरी प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी मा.तालुका कृषि अधिकारी भाऊसाहेब रूपनवर, मंडळ कृषि अधिकारी किरण पिसाळ, कृषि पर्यवेक्षक सरडे सो, खंडागळे सो व गावातील सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते. मंडळ कृषिअधिकारी पिसाळ सो यांनी बिजप्रक्रिया व उगवणक्षमता प्रात्यक्षिकाविषयी सखोल मार्गदर्शन केले. कृषि उत्पादन वाढीमध्ये बीजप्रक्रिया महत्त्वाचा घटक आहे. जमिनीतून व बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जैविक बिजप्रक्रिया 25 मिली ॲझेटोबॅक्टर व पीएसबी प्रति किलो बियाण्यात वापरावे तसेच उगवणक्षमता तपासूनच बियाणे लागवडीस वापरावे असे आवाहन करण्यात आले पहिला वळीवाचा पाऊस झाल्यानंतर हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळे लावण्यासाठी मार्गदर्शन केले. कृषि पर्यवेक्षक खंडागळे सो (गोपाळ खंडागळे) यांनी बिजप्रक्रिया व ऊगवणक्षमता प्रात्यक्षिक करून तांत्रिक मार्गदर्शन केले. मा. तालुका कृषि अधिकारी भाऊसाहेब रुपनवर यांनी कृषि विभाग योजनांविषयी मार्गदर्शन करताना महाडीबीटी पोर्टल विविध घटकांसाठी अर्ज करण्याचे अवाहन केले. तसेच तरुण पिढीसाठी वैयक्तिक किंवा गटासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मध्ये सहभागी करून घेण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उन्नयन योजना (PMFME) मध्ये अर्ज करण्याचे अवाहन केले. यासाठी प्रक्रिया उद्योग प्रकल्प खर्चाच्या 35% अनुदान मिळते.
यावेळी गावातील प्रगतशील शेतकरी कुंडलीक धुमाळ यांनी कृषि विभाग अधिकारी, कर्मचारी यांचे आभार मानून उपस्थित सर्व शेतकऱ्यांना योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी कृषिसहाय्यक स्वाती धुरगुडे, संघर्ष साळवे व गावातील उपस्थितांमध्ये नामदेव पवार, ठकाप्पा गावडे, अरुण भोईटे, बुद्धिवान गोरे, संतोष धुमाळ,तानाजी धुमाळ, महादेव धुमाळ,शहाजी धुमाळ, रमेश धुमाळ इत्यादी शेतकरी उपस्थित होते व इतर अनेक शेतकरीही उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन कृषिसहाय्यक पल्लवी काळे यांनी केले.