अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पालकमंत्र्यांकडून पाहणी
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते पाटण( सातारा)
सडा वाघापूर (ता पाटण )येथे दिनांक 10 मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक धरावरील पत्रे उडाले होते .शुक्रवारी दुपारी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घालत अनेक घरांचे नुकसान केले आहे अनेकांचे परिवार अक्षरशः उघड्यावर पडले आहेत
यामध्ये सुमारे 3 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे शुक्रवारी दुपारी आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका सडावाघापूर व आजूबाजूच्या गावांना मोठ्या प्रमाणात बसला आहे . शासनाने त्वरित याची दखल घ्यावी व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तेथील ग्रामस्थ करत होते,