व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) कुलदीप मोहिते कराड
. महाराष्ट्र राज्य ज्ञान महामंडळ,mkcl, वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये कराड तालुक्याला जिल्ह्यामध्ये प्रथम येण्याचा मान लाहोटी कन्या प्रशाला कराड हिच्या विद्यार्थिनी सिद्धी विजयकुमार जगताप हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे
.mkcl उद्योग प्रशिक्षण मंडळाच्या वतीने कराड तालुक्यातील आशीर्वाद कॅम्पुटर सेंटर यांच्यावतीने दरवर्षी mkcl म्हणजे महाराष्ट्र राज्य ज्ञान मंडळ यांच्यावतीने पाचवी ते दहावीचा अभ्यासक्रम व सामान्य ज्ञान याच्या आधारित परीक्षा घेतली जाते विद्यार्थ्यांच्या मध्ये जनरल नॉलेज वाढावे व स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे हा हा उद्देश आहे व विद्यार्थ्यांच्या मध्ये कौशल्य विकास व्हावा राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये याची अंमलबजावणी आहे विद्यार्थी हे पुस्तकी ज्ञानी न होता कौशल्य विकास पूर्व होण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी ही परीक्षा घेतली जाते
नोव्हेंबर 2023 मध्ये आयोजित उद्योग प्रशिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये कुमारी सिद्धी विजयकुमार जगताप इयत्ता आठवी लाहोटी कन्या प्रशाला कराड हिने प्रथम क्रमांक जिल्ह्यामध्ये मिळवला कुमारी आशाना कदम हिने दुसरा क्रमांक मिळवला कुमारी निदा आरिफ मोमीन हिने उत्तम गुण प्राप्त केले
ही परीक्षा आशीर्वाद कॅम्पुटर सेंटर कराड यांच्या मार्गदर्शन केले होते सेंटरचे संस्था संचालक सुनील यादव सौ आराधना यादव यांनी विद्यार्थिनीचे मार्गदर्शन केले या यशाबद्दल संस्थेचे कौतुक मुख्याध्यापक शिक्षक वर्ग श्री यादव सर यांनी अशा स्पर्धा मार्गदर्शन परीक्षेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान केले