व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) शौकत पठाण
माळशिरस माळशिरस तालुक्यातील अनेक पतसंस्था ह्या कर्जदारांना कर्ज देताना इमारत निधी, शैक्षणिक निधी यासह अनेक निधी गोळा करून तोच पैसा परत कर्ज स्वरुपात कर्जदारांना देऊन परत त्या पैशाला व्याज लावले जात आहे. त्यामूळे कर्जदार हा पुरता मेटाकुटीला आला आहे.याकडे सहाय्यक निंबधक यांचे दुर्लक्षामुळे अनेक कर्जदार गाव सोडून गेले आहेत. तर काही कर्जदार हे आत्महत्या करण्याकडे चालले आहेत. त्यामूळे अशा पतसंस्थांचे फावले असून याकडे लोकप्रतिनिधीनी लक्ष घालण्याची गरज आहे. दुसऱ्या भागात पहा एक लाख कर्ज काढल्यानंतर कर्जदाराच्या हातात किती रक्कम येते आणि व्याज मात्र पूर्ण रकमेला घेतले जाते. निर्मला मदने माळशिरस