पर्यावरण जनजागृती गरजेची: रामानंद परब
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
कराड -प्रतिनिधी
कृष्णा नदी बचाव चळवळ महाराष्ट्र राज्य कराड व विवेकानंद पर्यावरण फौज गोवा यांच्या वतीने नैसर्गिक कलर कार्यशाळा विटा माता विद्या मंदिर कराड येथे संपन्न झाली पर्यावरण पाणी बचत केमिकल मुक्त रंगपंचमी विटामाता विद्यालय कराडचा अनोखा उपक्रम यावेळी विद्यालयातर्फे राबविण्यात आला
… सध्या महाराष्ट्र मध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे सातारा जिल्ह्यामध्ये दोन लाख लोकांना टॅंकरने पाणी पुरवले जात आहे ही परिस्थिती पाहून येणारी रंगपंचमी केमिकल मुक्तरंगपंचमी नैसर्गिक रंगपंचमी विद्यार्थ्यांनी साजरी करावी व पाणी बचतीचा संदेश द्यावा देशातील 315 नद्या दूषित आहेत व महाराष्ट्रातील 54 नद्या दूषित आहेत त्यामुळे कृष्णा नदी चळवळ माध्यमातून पाणी बचतीचा संदेश काळाची गरज आहे यासाठी कृष्णा बचाव चळवळ विवेकानंद पर्यावरण फौज गोवा यांच्या संयुक्त विद्यमानाने कराड तालुक्यातील विद्यालयात नदी प्रदूषण मुक्त उपक्रम घेत आहे यासाठी विद्यार्थ्यांना नैसर्गिक कलर वापरण्यासाठी चळवळीच्या माध्यमातून प्रवृत्त करण्यात येत आहे

या कार्यक्रमासाठी गोव्याच्या विवेकानंद पर्यावरण फौजचे सूर्यकांत गावकर यांनी नैसर्गिक कलर व त्याचे फायदे याची माहिती व प्रात्यक्षिक विटा माता कराड येथील विद्यार्थिनींना दिले या कार्यक्रमासाठी कृष्णा नदी बचाव चे राहुल पवार आबासाहेब चव्हाण अशोक सुतार विजय जगताप पत्रकार कुलदीप मोहिते सागर पाटील विजया माने शाळेच्या मुख्याध्यापक उषा थोरात सानप मॅडम चव्हाण मॅडम शिवाजी शिक्षण संस्थेचे माध्यमिक चे अध्यक्ष जयंत पाटील शिवाजी शिक्षण संस्थेचे सर्व सदस्य कराडचे युवा नेते सौरभ पाटील यांचे सहकार्य लाभले अशा


