गुरुवार दिनांक 23/02/2024 रोजी माण -खटाव चे कार्यसम्राट आमदार जयकुमार गोरे यांच्या स्थानिक विकास निधी मधून भाटकी गावातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या मारुती मंदिरासमोरील मोकळ्या जागेमध्ये भव्य अशा सभामंडपाचे काम सरपंच श्री. लालासो कोडलकर व गावातील जेष्ठ नागरिक श्री. काशिनाथ शिर्के, राजाराम शिर्के बाबासो शिर्के, हनुमंत शिर्के व व्यंकटराव शिर्के या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.
या सभा मंडपाचे काम मंजूर करून घेण्यासाठी भाटकी गावचे युवा नेते व आमदार जयकुमार गोरे यांचे कट्टर समर्थक श्री.अंकुश मनोहर शिर्के यांनी विशेष प्रयत्न केले. माण-खटाव मतदारसंघांमधील पूर्व भागामध्ये असणाऱ्या गावांपैकी भाटकी गावावर आमदार साहेबांचे विशेष प्रेम आहे. त्यामुळे आमदार साहेबांनी भाटकी गावासाठी या आर्थिक वर्षामध्ये आठ कोटी रुपयांची कामे गावासाठी दिलेली आहेत. आजच्या या सभामंडपाचे उद्घाटन प्रसंगी भाटकी गावातील विकास सेवा सोसायटीचे चेअरमन श्री. राहुल देवकर, युवा नेते अंकुश शिर्के, ग्रामपंचायत सदस्य श्री. रावसाहेब शिर्के, अनिल शिर्के, रमेश पवार, दिनकर शिर्के, भारत सत्रे, विशाल शिर्के, नितीन शिर्के, किरण शिर्के इत्यादी मान्यवर उपस्थित होते.