मदनवाडी (ता. इंदापूर) येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त,शालेय साहित्याचे वाटप.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
इंदापुर (प्रतिनिधी) 
गणेश मिंड 

    मदनवाडी (ता. इंदापूर) येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त, मराठा महासंघ भिगवण चे मार्गदर्शक व मयुर पतसंस्थेचे मा चेअरमन स्व. शंकरराव आण्णा गायकवाड यांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्यकर्ते हर्षवर्धन ढवळे मित्र परिवाराच्या वतीने अडीचशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

        हर्षवर्धन  ढवळे मित्र परिवार नेहमी समाज उपयोगी कार्यक्रम घेत विधायक काम करीत आहेत सदर परिवाराचे स्वर्गीय शंकरराव गायकवाड यांच्याबरोबर स्नेहाचे संबंध असल्यामुळे व त्यांचे नुकतेच निधन झाल्यामुळे शिवजयंतीचा कार्यक्रम रद्द करून त्यांनी शिवजयंती निमित्त समाज उपयोगी कार्यक्रम घेत शिवरायांचे विचार खऱ्या अर्थाने जतन करत असल्याची भावनायावेळी व्यक्त केली. शाळेतील विद्यार्थीनी स्नेहा बडंगर हिने मनोगत व्यक्त केले..

   कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रमोदकुमार कुदळे यांनी केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आबासाहेब देवकाते, नानासाहेब बंडगर, भिगवण मा. आदर्श सरपंच हेमाताई माडगे, आप्पासाहेब गायकवाड.सचिन बोगावत, विश्र्वास देवकाते विष्णूपंत देवकाते , आण्णासाहेब ढवळे,राजेंद्र देवकाते, आण्णासाहेब धवडे, रणजित निकम, जालिंदर ढवळे, , कुंडलिक बंडगर, राजेंद्र भिसे, सुभाष फलफले, संजय बंडगर, राहूल ढवळे, अमोल गायकवाड, अक्षय जगताप, विशाल धुमाळ, अक्षय ढवळे ,दिनेश भोईटे, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!