मेंढपाळाच्या वाड्यावर लांडग्याच्या कळपाने हल्ला केल्याने १९ मेंढ्यांच्या पिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे मेंढपाळांचे आथिॅक नुकसान झाले आहे. तरी शासनाच्या पीडित मेंढपाळाला तात्काळ आथिॅक मदत करावी अशी मागणी डॉ. प्रमोद गावडे यांनी केली आहे.
लाडेवाडी ता. माण शिवारामध्ये मेंढपाळ सुखदेव खताळ यांचा मेंढ्यांचा वाडा आहे. खताळ मेंढ्या चरायला घेऊन गेले असता दुपारच्या वेळी लांडग्याच्या कळपाने वाड्यावर असलेल्या १९ पिलांवर हल्ला केला. त्या हल्ल्यात १९ कोकरं मृत्यूमुखी पडले आहेत यामुळे मेंढपाळाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
घटनास्थळी माजी नगराध्यक्ष तुषार वीरकर, डॉ. प्रमोद गावडे व सहकाऱ्यांनी भेट देऊन मेंढपाळाशी संवाद साधून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर कारवाई करून मेंढपाळला मदत देण्याची मागणी केली. सदर घटनेचा वन विभागामार्फत पंचनामा झाला असून तातडीने मदत मिळवून द्यावी अशी मागणी होत आहे.