भाटकी ता.माण येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह भाटकी येथे भाटकी पंचक्रोशीतील महिलांनी मकर संक्रांतीचे औचित्य साधून हळदी-कुंकवाचा समारंभ आयोजित केला होता. सदरच्या या कार्यक्रमाला माण तालुक्याचे पाणीदार आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या सुविद्य पत्नी सौ. सोनियाताई गोरे (वहिनी) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
त्यांनी सर्व महिलांना उद्बोधन केले. त्यावेळी महिलांना त्यांनी सर्व सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे विषयी विनंती केली. तसेच त्यांनी आरोग्यविषयक महिलांनी कोणती काळजी घ्यावी, तसेच ग्रामीण व शहरी भागातील महिलांच्या आरोग्यामधील फरक काय आहे, हे समजावून सांगितले आणि ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याची मनापासून स्तुती केली. ग्रामीण भागातील महिला या कष्टकरी असतात, त्यामुळे त्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी त्याची मदत होते. पुढील काही दिवसांमध्ये आपण भाटकी गावातील महिलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्याची त्यांनी बोलून दाखवले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. शामल पवार यांनी केले. प्रमुख पाहुणे यांचे स्वागत सौ.साधना शिर्के, शोभा शिर्के व अश्विनी देवकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार सौ. अमृता शिर्के यांनी मानले. हा कार्यक्रम दिमाखदार होण्यासाठी प्रियंका शिर्के, राजश्री शिर्के, मंगल शिर्के, आरती जगताप, कु. मोनाली शिर्के, दिक्षा शिर्के यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी कोडलकरवाडी, गाडेकरवाडी, पवारमळा, रकटेवस्ती, पोळवस्ती, वाघोबा वस्ती व बिरोबा वस्ती या परिसरातील जवळपास ३०० महिलांचा उदंड प्रतिसाद होता. कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व महिलांना युवा नेते अंकुश शिर्के यांनी स्नेहभोजन दिले.