श्री सिध्दनाथ नागरी पतसंस्था निवडणूकीत जय हो ! आ. जयकुमार गोरे पुरस्कृत पॅनेलचा क्लीन स्वीप ; फलटणमध्ये आ. रामराजेंना धक्का..

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
 म्हसवड
                    संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये आमदार जयकुमार गोरे पुरस्कृत श्री सिद्धनाथ सभासद,सेवक पॅनलने सहकार बचाव पॅनलचा १३-० ने दारुण पराभव करत विरोधकांना क्लीन स्वीप दिला. माजी सभापती आ. रामराजेंसह अनेक मात्तबर विरोधक लढाईत उतरले तरी परिवर्तन पॅनेलने दणकेबाज विजय मिळवून आ. जयकुमार गोरेंचा प्रभाव दाखवून दिला.
         श्री सिध्द्नाथ सहकारी पतसंस्थेच्या निवडणूकीत आ. जयकुमार गोरे आणि सहकाऱ्यांनी सभासद आणि ग्राहकांना पारदर्शी कारभाराची आणि संस्थेचा नावलौकिक वाढविण्याची ग्वाही दिली होती. पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या चुका त्यांनी प्रभावीपणे मांडल्या. विरोधात सहकार बचाव पॅनेलला हस्ते परहस्ते अनेक बड्या हस्तींनी मदत केली होती, मात्र सभासद मतदारांनी परिवर्तन पॅनेलला भरभरून मतदान केले. आ. गोरेंच्या मार्गदर्शनाखाली सर्वच्या सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. निवडणूकीत इतर मागास प्रवर्गातील उमेदवार अरुण दादासो गोरे ५२३४ मते मिळवून १९५५ मतांनी विजयी झाले. विमुक्त जाती जमाती विशेष प्रवर्गातील उमेदवार बाबासाहेब(मामूशेठ) विरकर ५०७५ मते मिळवून १६४२ मतांनी विजयी झाले. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील उमेदवार जयवंत श्रीरंग रोकडे ५२०२ मते घेऊन विजयी झाले. महिला राखीव प्रवर्गातून नंदाबाई चंद्रकांत दडस ५०७९ मते, पूनम रणजित पोळ ह्या ४९९२ मते मिळवून विजयी झाल्या. सर्वसाधारण प्रवर्गातून महादेव विश्वनाथ कदम,४८५७, अर्जुनतात्या चांगदेव काळे ४९६८, चंद्रकांत सुदाम जगदाळे ४७८१, बापू ज्ञानू जाधव४८५७, राजेंद्र ब्रह्मदेव जाधव ४८४६, विजय रंगराव जाधव ४९४१, दत्तात्रेय नथुराम देशमाने ४८३५, नारायण जगन्नाथ विरकर ४८४६ मते घेऊन विजयी झाल.
              तब्बल ३३ वर्षानंतर संस्थेत सत्तांतर घडवून परिवर्तन पॅनेलने जल्लोष केला. निवडून आलेल्या सर्व संचालकांनी मिरवणूक काढत श्री सिद्धनाथाचे दर्शन घेतले. श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था ही दुष्काळी माण तालुक्याची आर्थिक वाहिनी समजली जाते. राज्यातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून ही संस्था परिचित आहे. महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार या संस्थेने मिळवले आहेत. या संस्थेची निवडणूक लागल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. परंतु आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखालील श्री सिद्धनाथ सभासद सेवक परिवर्तन पॅनलवर सभासदांनी विश्वास टाकत सर्वच उमेदवारांना विक्रमी मताधिक्याने विजयी केले. माण, खटाव च्या जनतेने आमदार जयकुमार गोरे यांच्यावर तीन वेळा विश्वास दाखवत त्यांना विधानसभेत पाठवले. जनतेच्या विश्वासावर त्यांनी मतदारसंघाचा कायापालट केला आहे. सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी भरभराट करेल असा विश्वास असल्यानेच सभासद मतदारांनी परिवर्तन पॅनेलवर विश्वास दाखवला आहे.
          आम्ही सभासदांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. दुष्काळी माण तालुक्याची अर्थवाहिनी असणाऱ्या सिद्धनाथ पतसंस्थेचा नावलौकिक देशात उंचावेल अशी कामगिरी करून दाखवा असे आवाहन आमदार जयकुमार गोरे यांनी संचालकांना केले.
चौकट .….
  फलटणमध्ये रामराजेंना धक्का ….. जिथे गोरे तिथे विरोधात मी आहेच असे म्हणत सिध्दनाथ पतसंस्थेच्या निवडणूकीत चांगलेच लक्ष घातलेल्या माजी सभापती रामराजेंना खुद्द फळटणमध्येच धक्का बसला. विजयी झालेल्या परिवर्तन पॅनेलला फलटणमध्ये तब्बल १४३ मतांचे लीड मिळाले. जिल्ह्यातील सर्वच मतदानकेंद्रातील बूथवर आ. गोरेंच्या मार्गदर्शनाखालील परिवर्तन पॅनेलला चांगलेच लीड मिळाल्याने विजयी संचालकांची दहिवडी आणि म्हसवड येथे गुलालाची उधळण करत फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. 

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!