कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथे दि.28/01/2024 रोजी  शहीद दिवस होणार साजरा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
कराड

             वडगाव हवेली गावचे सुपुत्र शहीद वीर जवान हवालदार मेजर शिवाजी बाळु जगताप हे 28 जानेवारी 1994 रोजी “ऑपरेशन रक्षक” या आतंक वादी विरोधी मोहिमे मध्ये जम्मू काश्मीर (कुपवाडा) येथे  दोन आतंकवाद्यांना कंठ स्नान घालून ते वीर गतीस प्राप्त झाले ते देशासाठी शहीद झाले. 6 मराठा लाईट इनफन्ट्री मध्ये कार्यरत होते.त्यांना तत्कालीन राष्ट्रपती श्री शंकर दयाळ शर्मा यांचेकडून मरणोपरान्त कीर्ती चक्र प्रदान करून त्यांच्या पराक्रमाचा भारत सरकारने गौरव केला होता.

             त्यांच्या शौर्याला उजाळा देण्यासाठी महाराष्ट्र शासन अमृत वीर जवान अभियान समन्वय समिती कराड तालुका व मौजे वडगाव हवेली सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने शहीद दिवस श्रद्धांजली कार्यक्रम मौजे वडगाव हवेली येथील समाधीस्थळी रविवार दि. 28 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित केला आहे.

          माजी सैनिक , शहीद जवान, सेवारत सैनिक त्यांच्या कुटुंबाच्या समस्या सोडवने, सैनिक मेळावे आयोजित करणे, शहीद दिवस साजरे करणे  हे स्तुत्य उपक्रम अमृत वीर जवान अभियान अंतर्गत  राबविण्याचे धोरण शासनाने निश्चित केले आहे त्या नुसार कराड तालुक्यात समिती स्थापन करण्यात आली आहे व “सैनिक कक्ष” स्थापन करण्यात आले आहे.

           या शासन धोरणा नुसार  प्रशांत कदम अध्यक्ष सैनिक फेडरेशन सातारा जिल्हा व महाराष्ट्र शासन अमृत वीर जवान अभियान समिती माजी सैनिक संघटना प्रतिनिधी कराड तालुका यांनी मा. तहसीलदार  विजय पवार यांना शहीद दिवस साजरा करणेसाठी निवेदन देऊन अवगत केले होते.व त्या नुसार कराड तालुका . तहसीलदार  विजय पवार सचिव अमृत वीर जवान अभियान समिती  यांनी परिपत्रक काढून शहीद दिवस साजरा करणेचे निश्चित केले आहे.तरी या श्रद्धांजली कार्यक्रमा साठी  शासकीय ,प्रशासकीय,सामाजिक, शैक्षणिक,राजकीय, सर्व क्षेत्रातील मान्यवर व तरुण वर्ग,आजी/माजी सैनिक संघटना व सैनिक फेडरेशन पदाधिकारी,शहीद जवान कुटुंबीय, माजी सैनिक,शेतकरी वर्ग , ग्रामस्थ,देशप्रेमी सर्व मान्यवरांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन . प्रशांत कदम अध्यक्ष सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन यांनी केले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!