अकलूज येथे पार पडलेल्या नॅशनल लेव्हल अबॅकस चॅम्पियनशिप मध्ये नातेपुते येथील स्कॉलर आय चॅम्प अबॅकस च्या विदयार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवले आहे.
आरोही सूळ व ओवी ढालपे या विध्यार्थिनींनी 4 मिनिटे आणि 20 सेकंदत 100 गणिते सोडवून सुपर इंटेलिजन्ट ट्रॉफी च्या दोघी मानकरी ठरल्या.
तसेच सई कवितके, कार्तिकी रुपनवर,आरती रुपनवर, स्वराली पाटील, इन्शा तांबोळी, प्रेम रुपनवर, देवांशराम पोलाकी या मुलांनी सहा मिनिटाच्या आत 100 गणिते सोडवून पैकी च्या पैकी गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. इतर मुलांनी ही घावघवीत यश मिळवले आहे. या विध्यार्थ्यांना रेश्मा तांबोळी व आदीचे मार्गदर्शन लाभले आहे
ओवी ढालपे ही माण पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार विजय ढालपे यांची नात असून माण पत्रकार संघा तर्फे ओवी ढालपे हिचे विशेष अभिनंदन करण्यात आले