अयोध्येत सोमवारी श्रीराम प्राणप्रतिष्ठा होणार आहे या पार्श्वभूमीवर म्हसवड शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर म्हसवड नगरपरिषद हद्दीतील मटन, चिकन, मच्छी तसेच दारु विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात यावीत अशी मागणी म्हसवड पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांनी केली आहे.
उद्या दि २२ जानेवारी सोमवार रोजी अयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे त्यानिमित्त संपूर्ण देशभरात तसेच म्हसवड शहरात होमहवन, विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत त्या निमित्त म्हसवर नगरपरिषद हद्दीतील सर्व मटन, चिकन, चायनीज, मच्छी विक्री दुकाने बंद करणेत यावीत तसेच दारु विक्री व्यवसायही बंद रहावेत अशी मागणी निवेदनाद्वारे माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.