शरद महोत्सव अंतर्गत राष्ट्रवादी चषक २०२४ ही स्पर्धा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अभयसिंह जगताप व रॉयल स्पोर्ट्स सांगोला यांच्या विद्यमानाने माढा मतदारसंघातील करमाळा टेंभुर्णी नंतर प्रथमच सांगोल्यात ही या भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी चषक 2024 स्पर्धा शनिवार दिनांक ३ फेब्रुवारी पासून सुरू होत आहेत..
राष्ट्रवादी चषक 2024 आयोजित स्पर्धेत प्रथम बक्षीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अभयसिंह जगताप व मा. यश नाथा जाधव यांचे तर्फे ४लाख रुपये,द्वितीय क्रमांकाचे बक्षीस योगेशदादा खटकाळे यांचे तर्फे दोन लाख 50 हजार रुपये तर तृतीय बक्षीस अनिल नाना खटकाळे व दिलीप मस्के यांच्यातर्फे १,५०, ०००रुपये ,तर चतुर्थ बक्षीस हे कीर्ती सेल्स सांगोला व माननीय शहाजीराव सावंत यांचे तर्फे एक लाख तर चषक सौजन्य विजय भाऊ केदार मित्रपरिवार सांगोला, मॅन ऑफ द सिरीज मा. अभिषेक लिंगे गणेश मोबाईल शॉपी, मॅन ऑफ द मॅच फायनल गोरख केदारयांच्या तर्फे देण्यात येणार आहेत.युट्युब लाईव्ह सौजन्य सचिन शिंगाडे ,पांडुरंग देशमुख तर संतोष कोकरे यांच्याकडून पाणी व्यवस्था करण्यात आली आहे नाव नोंदणी युवराज केदार(७९७२७१८५८५) ईलाई मुजावर (९०१११५१२०१)जमीर मुलाणी(७७७५९०४०४४) यांच्याकडे संपर्क करावा.या स्पर्धा क्रीडा संकुल सांगोला या ठिकाणी होतील याची नोंद घ्यावी
अभय सिंह जगताप हे विविध इव्हेंट च्या माध्यमातून संपूर्ण माढा मतदारसंघाचा दौरा करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या आदेशाने त्यांनी माढा मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत. त्यांच्या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. एक युवक फळीतील शिलेदार या नात्याने पक्षाला बळकटी देण्याकामी त्यांची वाटचाल राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना किंबुवना माढा मतदारसंघाला बळकटी देणारी ठरणार असल्याचे मत सांगोल्यातील भेटी दरम्यान नागरिकांनी व्यक्त केले.