म्हसवड शहरात पाणी पुरवठा विस्कळीत .शहराला १२ दिवसानंतर ही पाणी पुरवठा नाही

बातमी Share करा:

व्हिजन२४ तास न्युज (संपादक: अहमद मुल्ला )
म्हसवड

            म्हसवड शहरात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरीकात संतांप शहराला १२ दिवसानंतर पाणी पुरवठा होत असल्याने नागरीकांना पाण्याचे टॅंकर विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे म्हसवड शहराला पाणी पुरवठा तातडीने न केल्यास तिव्र आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती माजी नगरसेवक शांताराम माने यांनी पत्रकाराशी बोलताना दिली

               मुख्याधिकारी डॉ सचिन माने यांनी शहराला दररोज सुरळीत पाणी पुरवठा करावा अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे  म्हसवड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी ७९ कोटी रु पिण्याची पाणी पुरवठा योजना मंजूर असून या पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण आहे तसेच म्हसवड येथील शेंबडे वस्तीवरुन शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी १५ कोटी रुपयाची आपतकालीन योजना सुरु केली होती मात्र तांत्रिक कारणामुळे व दुष्काळ पडल्यामुळे या योजनेचा पाणी पुरवठा बंदअवस्थेत आहे त्यामुळे शहरातील नागरीकांना पाणी पुरवठा समस्याला सामोरे जावे लागत आहे सध्या शहरात ७००रुपए प्रती टॅंकर याप्रमाणे पाणी विक्री खाजगी पुवठा दाराकडून करण्यात येत आहे यामुळे गोरगरीब जनतेला पाणी विकत घेणे शक्य नसल्यामुळे प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे म्हसवड न पा ने याबाबत कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे शहर व परिसरातील विहीरी कोरड्या पडलेल्या आहेत वाडी वस्तिवर व शहरातील मुख्यभागात टॅकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी होत आहे

चौकट:

  * याबाबत म्हसवड शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी माजी नगराध्यक्ष नितीन दोशी पत्रकार विजय टाकणे महेश कांबळे यांनी माण चे आ जयकुमार गोरे यांंना समक्ष भेटून म्हसवड पाणी पुरवठा तातडीने पाणीपुरवठा करण्याबाबत मागणी केली होती याबाबत मुख्याधिकारी डॉ सचिन माने यांना आम. गोरे यांनी सुरळीत पाणी पुरवठा करण्याबाबत सूचना केली आहे मात्र मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत या बाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे

 *शहरात नागरिकांना ७०० रुपये दराने मिनी टॅंकर ने पाणी विकत घेण्याची वेळ


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!