म्हसवड मध्ये श्री सिध्दनाथ महाराज माता जोगेश्वरी यांच्या रथोत्सवाच्या निमित्ताने दोन दिवसीय हॉलीबॉल स्पर्धा
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड प्रतिनिधी
श्री सिध्दनाथ महाराज माता जोगेश्वरी यांच्या रथोत्सवाच्या निमित्ताने माजी नगराध्यक्ष. श्रीमंत आजितराव राजेमाने यांच्या सौजन्याने भव्य दोन दिवसीय हॉलीबॉल स्पर्धाचे आयोजन दिनांक १६/१२/२०२३ ते १७/१२/२०२३ रोजी दुपारी १२ ते ६ या वेळेत करण्यात आले असून या हॉलीबॉल स्पर्धैचे सर्व हॉलीबॉल क्रिडा प्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन सिद्धनाथ हॉलीबॉल क्लब, चांदणी चौक, प्राथमिक शाळा, म्हसवड यांनी केले आहे
श्री सिध्दनाथ माता जोगेश्वरी यांच्या रथोत्सवाच्या निमित्ताने रथाचे मानकरी श्रीमंत अजितराव राजेमाने यांचे चिरंजीव श्रीमंत तेजसिंह राजेमाने यांच्या सौजन्याने सिद्धनाथ यात्रे निमित्ताने हॉलीबॉल स्पर्धा भरवण्यात आल्या असून या स्पर्धेची बक्षीस या प्रमाणे प्रथम पारितोषिक ११,०००/- रुपये व चषक ,व्दितीय पारितोषिक ७०००/- रुपये व चषक , तृतिय पारितोषिक ५०००/- रूपये व चषक,चतुर्थ पारितोषिक ३०००/- रुपये व चषक असे बक्षीस ठेवण्यात आले असून स्पर्धा शनिवारी व रविवार या दोन दिवसीय होणार आहे या स्पर्धेची संघ नोंदणी शनिवार सकाळी ११ वा. चांदणी चौक, प्राथमिक शाळा या ग्राऊंडवर नोंद केली जाणार आहे
स्पर्धेचे नियम व अटी या प्रमाणे पंचाचा निर्णय अंतीम राहील.,
शाररिक जबाबदारी स्वतःवर राहील, विजेता संघास नेट व बॉल दिला जाणार नाही.,सामने बाद पध्दतीने खेळवले जातील., गाडी खर्च दिला जाणार नाही.या स्पर्धेची प्रवेश फि ५०० रुपये राहिल नाव नोंदणी जयवंत लोखंडे 9423877039 / सुरेश काटकर 9421212141 / शंकर च़व्हाण 912121201 / नारायण मासाळ 9423033494 / राजेंद्र पिसे 9423264843 / आदम मुल्ला 9923096595 यांचेकडे स्पर्धेच्या आधी एक तास होईल असे नानासाहेब मासाळ यांनी सांगितले