मुलांची डोकी सुधारली की देश सुधारेल, शिक्षणामुळेच क्राती करता येईल : महादेवराव जानकर
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
विरकरवाडी ता माण येथे ,माजी केेबिनेट मंत्री महादेवजी जानकर यांच्या आमदार फंडातून वाचनालय व जिल्हा परिषद शाळेला डिजीटल शाळेकरीता १२ लाख रुपए मंजूर करण्यात आले होते त्या कामाचे उद्घाटन समारंभाचे आयोजन जि प शाळा विरकरवाडी येथे करण्यात आले होते या डिजीटल शाळेच्या उद्घाटन प्रसंगी माजी कॅबीनेट मंत्री महादेव जानकर बोलत होते याप्रसंगी सा जिल्हा बॅकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई , तहसिलदार विकास अहिरे, नायब तहसिलदार जंगम , उपसभापती मार्केट कमिटी वैशाली विरकर,माजी नगराध्यक्ष तुषार विरकर ग.शि.लक्ष्मण पिसे, किसन विरकर, इश्वरा विरकर, , डॉ बाळराजे विरकर, आप्पासाहेब पुकळे, गुलाराव उगलमोगले ,, बबन दादा विरकर दादासाहेब दोरगे आदी मान्यवर उपस्थित होते
या वेळी बोलताना जानकर पुढे म्हणाले आता शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षण चांगल्या प्रकारे मुलांना मिळाले पाहिजे मुलांची डोकी सुधारली की देश सुधारेल शिक्षणामुळेच क्राती करता येईल शिकेल तोच टिकेल जिल्हा परिषद शाळेतून गरीब शेतकरी व सामान्यांचीच मुले शिकत आहेत श्रीमंताची ;आमदार खासदाची मुले चांगल्या कॉन्व्हेट शाळेत शिक्षण घेऊन इंग्लड अमेरीकेत शिक्षणासाठी जात आहे सामान्यांची मुले शिकली पाहिजेत त्यांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी माझी तळमळ असल्याचे सांगून जानकर पुढे म्हणाले कर्मवीर भाऊराव पाटील आमच्या गावी आले नसते तर आम्हीही डॉक्टर इंजिनियर झालो नसतो यासाठी मी शिक्षणावर लक्ष केंद्रीत केले असून महाराष्ट्रातील अनेक जिल्हा परिषदेच्या डिजिटल शाळांसाठी मी आमदार फंडातून मोठ्याप्रमाणात फंडाचा वापर करत आहे मंत्रालयात ७२ विभाग आहेत त्या प्रत्येक विभागात माण मधिलच अधिकारी आहे यात अधिक वाढ झाली पाहिजे गावात एकवेळ रस्ता नसला तरी चालत जावे लागले तरी चालेल पण आपली मुले शिकली पाहिजे गावकरी समाज मंदिरासाठी ज्याप्रमाणे पुढाकार घेत आहेत त्याचप्रमाणे शाळा सुधारण्यासाठी देखील प्रयत्न झाले पाहिजेत सामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेऊन अधिकारी बनले पाहिजेत यासाठी गावकऱ्यांनी व शिक्षकांनी प्रयत्नशिल राहणे गरजेचे असल्याचे सांगून सध्या तालुक्यात गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे साहेबांचे काम खरोखर वाखानण्यासारखे असून त्यानी शाळा सुधार योजना मुलाची बुद्धीमत्ता वाढ योजनेत जे भरीव काम करत आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन
यावेळी अनिल देसाई , जगन्नाथ विरकर, दादासाहेब दोरगे, यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली
चौकट १) पुढच्यावेळी तुमची माझी भेट होईल तेव्हा मी १००टक्के रासपचा खासदारच असेन
२)जि प च्या शाळा टिकल्याच पाहिजे ,त्या पटा अभावी बंद करता येणार नाही त्यात काय सुधारणा करता येईल ते पहावे
३) नुसते आमदार खासदार मंत्री होऊन चालणार नाही खाली सेक्रेटरी अधिकारी चांगला नसेल तर काहीच होत नाही
अधिकारी महत्वाचा आहे