माझ्यावर माहेर व सासरचे समाज सेवेचे संस्कार असून ते व्रत मी ग्रामपंचायत सदस्य पदाच्या माध्यमातून पुढे चालू ठेवणार     :  सौ. समीरा दोशी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड(संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
म्हसवड येथील अहिंसा पतसंस्थेच्या वतीने जेऊर ता. करमाळा येथील ग्रामपंचायत निवडणुकीत भरघोस मतांनी सदस्य पदी  विजयी झाल्याबद्दल सौ. समीरा सुयोग दोशी  यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष व अहिंसा पतसंस्थेचे  चेअरमन नितिन  दोशी  यांचे हस्ते नुकताच करण्यात आला.
निवडणुकीतील यशा बद्दल कन्येचा सत्कार वडिलांच्या हस्ते घेण्याचा अहिंसा पतसंस्थेच्या वतीने दुर्मिळ योग घडविण्यात आला.
 या कार्यक्रमास  माजी नगराध्यक्ष नितीन भाई दोशी माजी नगराध्यक्ष वसंत मासाळ व माजी उपनगराध्यक्ष नारायण मासाळ, सुयोग दोशी, डॉक्टर राजेंद्र मोडसे, ज्ञानवर्धिनीचे प्राचार्य जे. डी. मासाळ, अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे संचालक श्री. लुनेश विरकर, बाळासाहेब पिसे या मान्यवरांची उपस्थिती होती.
     यावेळी सत्कारास उत्तर देताना सौ. समीरा दोशी  म्हणाल्या माझ्यावर माहेर व सासरचे समाज सेवेचे संस्कार असून ते व्रत मी ग्रामपंचायत सदस्य पदाच्या माध्यमातून पुढे चालू ठेवणार आहे. निवडणुकीतील यशामुळे माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जेऊर गावाची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. वेगवेगळ्या योजना राबवून व विकास कामे करून जेऊरचा कायापालट करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हसवड करांनी गेले आठ दिवसापासून केलेल्या सत्कारांनी व शुभेच्छांनी मी भारावून गेली असून मी त्यांची   सदैव ऋणी राहणार आहे.
प्रथमता: सौ. समीरा दोशी  व सुयोग दोशी  या उभयंतांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर अहिंसा पतसंस्थेत विविध संस्था, मान्यवर व अहिंसा परिवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्कार प्रसंगी ज्ञानवर्धिनीचे प्राचार्य जे. डी. मासाळ, न्यू इंग्लिश स्कूलच्या सौ. संध्या विरकर. सजगाने सर, माजी नगरसेवक विकास गोंजारी, माजी नगराध्यक्ष वसंत मासाळ, पत्रकार  आण्णासाहेब टाकणे, माजी नगराध्यक्ष नितीन भाई दोशी,  यांनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रम प्रसंगी श्री. राजकुमार शेठ दोशी,  निलेश सरतापे, अहिंसा पतसंस्थेचे संचालक अनिल गाडे, अजित मासाळ, प्रीतम शहा, अनिल लोखंडे, संतोष दोशी, माजी नगरसेवक आप्पा वीरकर ,सचिन विरकर, नारायण केवटे, असंख्य ग्रामस्थ व अहिंसा पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन अक्षय धट  यांनी केले व आभार बाबू मुल्ला मानले.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!