म्हसवड रिंगावण यात्रा पूर्व नियोजन बैठक संपन्न

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )

म्हसवड (प्रतिनिधी)-
म्हसवड येथील सिद्धनाथ जोगेश्वरी रथोत्सवाच्या यात्रेच्या पूर्व तयारी निमित्त प्राथमिक स्वरुपाची यात्रा समिती व प्रशासन यांची संयुक्त बैठक नुकतीच संपन्न झाली
म्हसवड येथील नगरपालिका सभागृहामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती या वेळेला माण चे तहसीलदार विकास अहिरे म्हसवड तहसीलदार जंगम ,
म्हसवडचे रथाचे मानकरी जय राजेमाने, बाळासाहेब राजेमाने,
बीडीओ. दहिवडी, साबां उप अभियंता धीरज विजापुरे, सहाय्यक अभियंता प्रकाश गायकवाड, शाम ठोंबरे, ग्रामीण पाणीपुरवठा सचीन खताळ, म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लोखंडे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कोडलकर वाहक नियंत्रक कोळी एम एस सी बी उपअभियंता आर. बी .डावरे , आर एम लादे, , वसंत भोसले,म्हसवड शहर वीज वितरण कंपनी उपअभियंता, म्हसवड- शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ म्हसवड नगरपालिका मुख्य लिपिक म्हसवड शहर नगरपालिका अभियंता चैतन्य देशमाने म्हसवड- महसूल तलाठी यु‌ डी‌ आकडमल., म्हसवड देवस्थान ट्रस्ट विश्वस्त गणेश गुरव,हरिभाऊ गुरव, वैभव गुरव, बुरांडे वकील ,पत्रकार व ग्रामस्थ उपस्थित होते.

म्हसवड सिद्धनाथ रथयात्रा उत्सव काळामध्ये सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन या वेळेला तहसीलदार विकास आहिरे यांनी केले म्हसवड येथील यात्रा नियोजन समितीच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सभेमध्ये ते बोलत होते या वेळेला म्हसवड शहर परिसरातील विविध समस्या यांचा आढावा तहसीलदार यांनी घेऊन गत वर्षी केलेल्या नियोजनात काही त्रृटी राहिल्या असतील तर त्यात काय सुधारणा करता येईल याविषयी चर्चा करण्यात आली या परिसरातील समस्या रथा पूर्वी सोडवण्यात येतील असे सांगितले तर म्हसवड शहरात येणाऱ्या भाविकांसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा देण्यासाठी विविध विभागाच्या कामाच्या नियोजनाचा आढावा घेतला , जे प्रशासकीय अधिकारी हयगय करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात येईल व अधिकाऱ्यांच्या वर योग्य ती कारवाई केली जाईल दि १ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी सातारा यांचे उपस्थितीत म्हसवड रिंगावण यात्रा नियोजनाची बैठक सिद्धनाथ मंदिरात होणार असून त्यावेळी संबंधित सर्व विभागानी आपल्या कामाच्या नियोजनासह उपस्थित राहण्याविषयी सूचनाही माण चे तहसीलदार विकास अहिरे यांनी केल्या


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!