संत शिरोमणी नामदेव महाराज यांची ७५३ वी जयंतीनिमित्त म्हसवड मध्ये विविध कार्यक्रम
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
संत शिरोमणी नामदेव महाराज यांची ७५३ वी जयंती या वर्षी कार्तिक शु एकादशी गुरुवारी (दि. २३) रोजी म्हसवड येथील संत नामदेव मंदिरात साजरी केली जाणार आहे या निमित्त विविध सास्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे नासपचे जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांनी सांगीतले.
येथिल संत नामदेव महाराज मंदिरात
श्री संत नामदेव मंदिराची गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेनुसार पुढील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
☆ सकाळी ६ ते ८ संत नामदेवांची काकड आरती,अभिषेक व विष्णूसहस्रनाम,
☆ सकाळी ९-३०ते१२ प्रा.सौ आकांक्षा बोंगाळे(संजिवनी विद्यालय पाचगणी )यांचे संत नामदेव महाराज यांच्या जीवनावर सुश्राव्य व्याख्यान,
☆ संजय प्रभाकर नेवासकर (पुणे )यांची नामदेव समाजोन्नती परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी निवड झाले प्रित्यर्थ सत्कार
☆ मा .दिलीपकाका लंगडे (मसूर )यांची नासप विश्वस्त पदी निवड झालेबद्दल सत्कार
☆ मा.वैभव पोरे यांना महाराष्ट्र शासनाचा २०२३चा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार व मार्गदर्शन
☆ दुपारी १२.१५ वाजता जन्मोत्सव व आरती
☆ दुपारी १ ते ३ प्रभोदनी एकादशी निमित्त सर्वांना फराळ व खिचडी वाटप आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून समाजबांधव तसेच नामदेव प्रेमींनी या विविध कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन नासपचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे व विश्वस्थ मंडळ समस्त शिंपी समाज,संत नामदेव मंदिर ट्रस्ट म्हसवड यांनी केले आहे