दिवाळीच्या पाडव्यानिमित्त मासाळवाडी येथे धनगरांची लक्ष्मी (मेंढी पालन) प्रदर्शन व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड प्रतिनिधी
मासाळवाडी (म्हसवड) ता. माण या ठिकाणी दिवाळीच्या पाडव्यानिमित्त मेंढी पालन प्रदर्शन व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता
हा कार्यक्रम रावसाहेब नारायण मासाळ व अजित मासाळ यांनी आयोजित केला होता यावेळी गतवर्षी पोलीस भरतीमध्ये हनुमंत मासाळ,महावीर मासाळ,सचिन मासाळ हे भर्ती झाले होते. त्यांचा मासाळवाडी पोलीस बॉईज यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला
तसेच दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या पाडव्याला धनगर समाजाची लक्ष्मी असलेल्या मेंढ्यांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या मेंडी पालकांना सहभागी होण्यासाठी पूर्ण कळप असणे आवश्यक होते.सदृढ व निरोगी कळप असणे विनामेंडपाळ मेंढरे पळवण्यास प्राधान्य दिले जाईल, मेंढरांची सजावट केलेली असावी असे नियम व अटी पंच कमिटीच्या वतीने ठेवण्यात आल्या होत्या या मेंढी पालन प्रदर्शनासाठी पाच बक्षिसे ग्रामस्थांच्या वतीने ठेवण्यात आली होती. यामधील प्रथम बक्षीस विठ्ठल आबा लुबाळ द्वितीय बक्षीस अमोल गोपाळ लुबाळ तृतीय बक्षीस सखाराम तातोबा मासाळ चतुर्थ बक्षीस दत्तू यशवंत मासाळ व पाचवी बक्षीस बुवा गिरजाप्पा मासाळ यांनी पटकावले प्रथम क्रमांकासाठी मधुकर मासाळ व अनिल मासाळ यांनी लाकडी कपाट हे बक्षीस ठेवले होते द्वितीय बक्षीस किसन मासाळ यांच्यावतीने सोफासेट ठेवण्यात आले होते तृतीय बक्षीस पांडुरंग मासाळ यांनी कुलर हे बक्षीस ठेवले होते चतुर्थ बक्षीस संजय मासाळ यांनी गोदरेज कपाट तर डॉक्टर सतीश मासाळ यांनी पाचवी बक्षीस लाकडी टेबल ठेवले होते
या मेंढी पालन प्रदर्शनामध्ये बक्षीस मिळवलेल्या मेंढीपालक कळप पालकांचा मानाचा फेटा व श्रीफळ देऊन समस्त ग्रामस्थ व तरुण मंडळ मासाळवाडी यांच्या वतीने करण्यात आल्याची माहिती मोदी हॉटेलचे मालक नवनाथ मासाळ यांनी दिली.पंच म्हणून आप्पा मासाळ सर्जेराव मासाळ विठ्ठल लुबाळ विठ्ठल मासाळ दत्तू मासाळ यांनी काम पाहिले तर सूत्रसंचालन सचिन मासाळ यांनी केले या कार्यक्रमाचे आभार मानगंगा संकुल मासाळवाडी चे अध्यक्ष डॉक्टर वसंत मासाळ यांनी मानले.