गणराया अवॉर्ड सामाजिक सालोख्याची संकल्पना:- अश्विनी शेंडगे

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
विठ्ठल काटकर 
कुकुडवाड प्रतिनिधी :
म्हसवड पोलीस स्टेशनचे सपोनि राजकुमार भुजबळ यांनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राबविलेला गणराया अवॉर्ड 2023 हा उपक्रम म्हणजे सामाजिक सलोखा राखण्याची उत्तम संकल्पना आहे हा उपक्रम सातत्याने चालू रहावा अशी अपेक्षा माण खटाव च्या उपविभागीय पोलीस अश्विनी शेंडगे यांनी व्यक्त केली.
त्या म्हसवड येथें आयोजित केलेल्या गणराया अवॉर्ड २०२३ या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.त्या पुढे बोलताना म्हणाल्या की
माणदेश ही रत्नांची खान आहे या दुष्काळी,भाग व पाणी टंचाई असलेल्या  पावसाचे अल्प प्रमाण असून पण या मातीने अनेक अधिकारी घडवले आहेत ही जशी रत्नाची खान आहे त्याबरोबर माण म्हणजे कलागुनांची हि खान आहे.असेही त्यांनी सांगितले त्या पुढे म्हणाल्या गणेशोत्सव काळात म्हसवड पोलिस ठाण्याच्या वतीने राबविलेल्या गणराय आवार्ड २०२३ या स्पर्धेत ज्या मंडळांनी सामाजिक भान ठेवून उत्सव साजरा केला ती मंडळे विजयी ठरली. कायदा हातात घेणाऱ्याला शिस्तीसाठी   कायद्याचा धाक इच्छा नसताना दाखवावा लागतोच गणराया आवार्ड स्पर्धेत यश मिळवले त्या मंडळाचे त्यांनी अभिनंदन केले व जे राहिले आहेत त्यांनी पुढील वर्षी अवॉर्ड साठी प्रयत्न करावा असे त्या म्हणाल्या.
सपोनि राजकुमार भुजबळ यांनी गणराया अवॉर्ड २०२३ चे नेटके नियोजन केले होते. या कार्यक्रमात महेश सोनवले यांच्या कला अविष्कार ग्रुपने रंगत भरण्याचे काम केले. शेतकऱ्यांची व्यथा या ग्रुपने सादर केली त्यावेळी सर्वजण भावनिक झाले.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक म्हसवड पोलिस स्टेशनचे सपोनि राजकुमार भुजबळ यांनी केले. त्यांनी सांगितले गेल्या वर्षापासून म्हसवड शहरातील व ग्रामीण भागातील नोंदणीकृत गणेश मंडळा मध्ये सामाजिक एकता, जागृत व्हावी या मधून चांगला उत्सव साजरा व्हावा यासाठी म्हसवड पोलिस स्टेशनने गणराया आवार्ड हा उपक्रम सुरु केला आहेत त्याचे हे दुसरे वर्ष आहे. कार्यक्रमासाठी म्हसवड दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे सरकारी वकील नदाफ साहेब , सपोनि राजकुमार भुजबळ गणराया आवार्डचे परिक्षक  पीएसआय वाघमोडे,पत्रकार विठ्ठल काटकर, पत्रकार एल के सरतापे, बापूराव मिसाळ शंकर पानसांडे, शहाजी लोंखंडे, अनिल पिसे, सचिन नवगन,माजी नगराध्यक्ष विलास माने, पोलिस पाटील, मंडळाचे पदाधिकारी नागरीक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणराया आवार्ड २०२३ चा प्रथम क्रमांक म्हसवड मधील वैभव गणेश मंडळ, दुसरा सिध्दनाथ मंदिर गणेश मंडळ, व तिसरा सहकार गणेश मंडळ तर ग्रामीण मध्ये प्रथम शिवशक्ती गणेश मंडळ कुकूडवाड, दुसरा विरळी गणेश मंडळ, तर तिसरा पळशी व गट्टेवाडी मंडळाना विभागून देण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी म्हसवड पोलीस स्टेशन व महेश सोनवले कला अविष्कार ग्रुप व पोलीस पाटील संघटना यांनी परिश्रम घेतले. अभिजित भादूले यांनी आभार मानले.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!