जनतेची लूट केल्यानेच ४० वर्षे सत्तेत असणाऱ्याना सत्तेतून बाहेर जावे लागले, आता त्यांचे समूळ उच्चाटन करा असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड :
आ. जयकुमार गोरेंसारख्या कल्पक आणि धडाडीच्या नेतृत्वामुळेच माण आणि खटाव तालुक्यांचा सर्वांगीण विकास साध्य होत आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच म्हसवड शहरासाठी ८० कोटींची पाणीयोजना मंजूर झाली आहे. अडचणीत सापडलेल्या बळीराजाला मदत करण्यात आमचे सरकार कायमच तत्पर राहिले आहे.दुष्काळात शेतकऱ्यांना जनतेला मदत करताना हात आखडता घेतला नाही प्रत्येक संकटात आपले सरकार उभे राहिले आयुष्यमान भारत योजनेतून राज्यातील १२ कोटी जनतेला ५ लाखापर्यंत औषधोपचार खर्च मोफत करण्याची योजनांचा लाभ देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. चाळीस वर्षे सत्तेत असणाऱ्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले नाहीत. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी सध्या त्यांचा थापा मारण्याचा उद्योग सुरु आहे. त्यांनी जनतेची लूट केल्याने सत्तेतून बाहेर जावे लागले, आता त्यांचे समूळ उच्चाटन करा असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
माण-खटाव चे आ. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातुन म्हसवड शहराच्या ८० कोटींच्या पाणी पुरवठा योजना आणि इतर २२ कोटींच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. जयकुमार गोरे, आ. राहुल कुल, सौ. सोनिया गोरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम,मनोजदादा घोरपडे,माजी जि. प. सदस्य अर्जुन तात्या काळे, अरुण गोरे, तालुकाध्य शिवाजीराव शिंदे, धनंजय चव्हाण, दादासाहेब काळे, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, विजय धट, नितीन दोशी, सुरेश म्हेत्रे, वैशाली लोखंडे, साधनाताई गुंडगे, धनश्रीदेवी राजेमाने, अकिल काझी, डॉ. वसंत मासाळ, इंजि. सुनिल पोरे, अॅड. भास्करराव गुंडगे, सिध्दार्थ गुंडगे, दत्तोपंत भागवत, गावोगावचे भाजपचे पदाधिकारी आणि महिला भगिनी हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या.
राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले, केंद्र आणि राज्यसरकारच्या माध्यमातून २०२४ पर्यंत सर्व घरांमध्ये पिण्याचे पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जनतेच्या मनातील सरकार राज्यात आल्याने लोकहिताचे अनेक निर्णय घेतले जात आहेत. एक रुपयात पिकविम्यासह शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत केली जात आहे. ९० टक्के शेतकरी या पीकविमा योजनेत सामील झाला आहे भकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री ऑनलाईन होते. दहा कोटी खर्च करुन दहीवडीला शेळी मेंढी संशोधन केंद्र आणि दीड महिन्यात म्हसवड येथे तहसील कार्यालय सुरु करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
खा. रणजितसिं नाईक निंबाळकर म्हणाले, माण , खटावमध्ये गेल्या साठ वर्षात झाला नाही त्यापेक्षा कैक पट अधिक विकास गेल्या बारा वर्षात आ. जयाभाऊंनी करुन दाखवला आहे. बारामती आणि काही फलटणकरांनी आजपर्यंत या भागाला विकासापासून वंचित ठेवण्याचे पाप केले.
आ. जयकुमार गोरे म्हणाले, सिध्दनाथाच्या नगरीतील माता भगिनींना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. पंतप्रधान आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळे शहरासाठी ८० कोटींची पाणीयोजना मंजूर करु शकलो. माझ्या तिन्ही निवडणूकांमध्ये म्हसवडकर जनतेने मला भरभरून आशिर्वाद दिले. त्यातून उतराई होण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत आलो आहे. आमची सत्ता असताना कोट्यवधींचा निधी आणून म्हसवडचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. अनेक विकासकामे मार्गी लावली होती. परिवर्तन झाल्यावर मात्र पाच वर्षांपूर्वी मंजूर असणारी कामे सुद्धा सत्ताधारी गटाला पूर्ण करता आली नसून कोठ्यावरील रुपयांचा फंड नगरपालिकेच्याकडे शिल्लक होता हा फंड सत्ताधारी गटाच्या नाकर्तेपणामुळे परत गेला असून अर्धवट राहिलेली कामे सुद्धा गेल्या पाच वर्षांमध्ये पूर्ण करता आली नाहीत हे म्हसवड शहराचे मोठे दुर्दैव असून गेल्या पाच वर्षांमध्ये म्हसवड शहरांमध्ये कोणतेही विकास काम झाले नाही म्हसवड शहराची अवस्था अत्यंत वाईट झाली असून शहरातील अंतर्गत रस्ते एका पावसात वाहून गेले आहे तर म्हसवड शहरांमध्ये बांधण्यात आलेल्या गार्डनची दयनीय अवस्था झाली असून गार्डन मध्ये आता जनावरे फिरू लागलेली आहेत तर अत्यंत सुसज्ज बांधलेली स्मशानभूमी अत्यंत गलिच्छ झाली असून या स्मशानभूमीमध्ये असणाऱ्या सोयी सुविधा सुद्धा नगरपालिकेला देता आल्या नाहीत शहराची अवस्था बकाल झाली आहे. आम्ही आता पाणीयोजनेसह १०२ कोटींच्या निधीतून अनेक कामे साकारत आहोत. छ. शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी, म. गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. फुले यांचे पुतळे आणि सुशोभीकरणासाठी कोग्यवधींचा निधी आणला आहे. बारामती आणि फलटणकरांनी टोकाचा विरोध केला तरी संघर्ष करुन या भागात एम मायडिसी मंजूर करुन आणली आहे. २५ हजार जणांना याद्वारे रोजगार उपलब्ध होणार आहे. मतदारसंघातील ९७ गावांमध्ये उरमोडीचे पाणी पोहचले आहे. लवकरच जिहेकठापूरचे पाणी येत आहे. ४४ गावांना टेंभूचे अडिच टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग नुकताच मोकळा झाला आहे. कुवत नसलेली लबाडांची टोळी पाणीप्रश्न कधीच सोडवू शकत नाही असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
कार्यक्रमात आ. राहुल कुल, इंजि. सुनील पोरे, डॉ. मासाळ, विजय धट, रेश्मा कलेढोणे आदिंनी मनोगते व्यक्त केली.
चौकट .….
धो धो पावसात हजारोंच्या जनसमुदायाची उपस्थिती …..
अत्यंत जिव्हाळ्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ८० कोटींच्या योजनेद्वारे सुटल्याचे पहायला हजारोंचा जनसमुदाय पडत्या पावसात उपस्थित होता. दिवसभर गजीनृत्याने कार्यक्रमात रंगत आणली होती. आ. जयकुमार गोरेंसह अनेकांनी ढोल वाजवत ठेका धरला. जलकलश डोक्यावर घेऊन शेकडो महिलांनी शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढली.
चौकट ..….
भारतीय जनता पार्टीत इनकमिंग फर्मात …..
आ. जयकुमार गोरेंच्या अश्वासक आणि विकासात्मक नेतृत्वावर विश्वास ठेवत गोंदवलेचे सुरज पाटील अभिजित कट्टे चेरमन पंकज पाटील उमेश बडके किरण दोरसे सुदाम भोसले बाळासाहेब कट्टे संतोष कट्टे सुनील शिंदे दादासाहेब माळी, रवी कदम, सुनील शिंदे,तसेच वरकुटे परिसरातून शिवाजी माने दशरथ चव्हाण अमोल जाधव भारत जाधव ,विशाल कदम,पंकज शिलवंत यांचेसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पाणीयोजनेच्या भूमिपूजनप्रसंगी आणि व्यासपीठावर नयनरम्य आतषबाजी करण्यात आली. हलगीचा कडकडाट आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.