जि.प शाळा माणगंगानगर ता. माण येथे आजी आजोबा स्नेहमेळावा उत्साहात साजरा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
विजयकुमार ढालपे
 गोंदवले
सध्याची कौटूंबिक परिस्थिती पाहता आई वडील नोकरी अथवा व्यवसाया निमित्तानं घराबाहेर जास्त असल्याने पाल्याची संपूर्ण जबाबदारी आजी आजोबांवर असते शाळा सोडून जास्त वेळ ते आजी आजोबासोबत घालवतात.
खरं पाहता आजी आजोबा आणि नात किंवा नातू हे नाते विलक्षण वेगळे असते ‘आ’ म्हणजे आई आणि ‘ जी’ म्हणजे जीव… आई सारखा जीव लावणारी आजी असते. आजी आजोबांशी नातवाशी असलेल्या घट्ट ना त्याची ओळख होणे आजच्या काळात महत्वाचे असून हे नातं पाल्याच्या विकासासाठी गरजेचे व प्रेरणादायी आहे.
शाळेतील अनुभवासत आजी आजोबांचे अनुभव त्यांच्या हितगुजातून मिळणारी माहिती या गोष्टी पाल्याच्या जडणघडणीत महत्वाच्या ठरतात म्हणूनच आज जि प शाळा माणगंगानगर शाळेत आजी आजोबा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री देवकर सर यांनी केले सुरुवातीला आजी आजोबांच्या हस्ते प्रतिमापूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली सुरुवातीस विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबांचा परिचय करून दिला आजी आजोबांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले श्री नारायण माने आजोबा यांनी आपल्या अनुभवाची शिदोरी सर्व विद्यार्थ्यांसमोर रिती केली अनेक आजी आजोबांनी आपले अनुभव सांगितले सर्व आजी आजोबांना अल्पोपहार देऊन मग त्यांच्या साठी संगीत खुर्चीचे आयोजन केले होते. आजोबा आपली पळत पकडताना नातवांचा आनंद गगनात मावत नव्हता आजोबाना आजीना आपली विद्यार्थी दशा आठवली असा आगळावेगळा उपक्रम पाहून ते अगदी हरकून गेले आणि विद्यार्थीही खूप खूष झाले होते. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन सामितीच्या अध्यक्षा  मनिषा जाधव व माजी सरपंच वामन जाधव उपस्थित होते. शाळेचे संपूर्ण सूत्रसंचालन उपक्रमशील दयाराणी खरात यांनी केले तर आभार श्री देवकर सर यांनी मानले

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!