डॉ.अजित ओंबासे यांची जिल्हा बँकेत पशुसंवर्धन अधिकारीपदी निवड
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड,
डॉ.अजित अशोक ओंबासे यांची सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत पशुसंवर्धन अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे.
वडगाव ( ता.माण ) येथील डॉ.अजित ओंबासे रहिवाशी असुन यापुर्वी ते मोही ता.माण येथे पशुविकास अधिकारी या पदावर सेवेत होते.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पशुसंवर्धन अधिकारी हे एकच पद असुन जिल्हा बँक व या बँकेच्या माध्यमातून विकास सेवा सोसायट्या अंतर्गत शेतकरी वर्गास दुग्ध व्यवसायासह पशुसंवर्धन करिता कर्ज पुरवठा केला जातो.यामध्ये महत्वाची भुमिका जिल्हा बँकेच्या पशुसंवर्धन अधिकारी यांचेवर असते.
डॉ.अजित ओंबासे यांची जिल्हा बँकेच्या पुशुसंवर्धन अधिकारी पदी नियुक्ती झाले बद्दल वडगाव येथील विविध मंडळे ग्रामस्थ याबरोबरच माण-खटाव तालुक्यासह जिल्ह्यातील सामाजिक राजकीय स्थरातून अभिनंदन केले जात आहे.