अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या दोन्ही आरोपीस तात्काळ अटक:निर्भया पथकाची दबंग कामगिरी.*
व्हिजन२४ तासन्युज म्हसवड(संपादक:अहमद मुल्ला )
सादिक शेख
नाशिक पोलीस टाइम्स
सातारा जिल्हा प्रतिनिधी.
अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या दोन्ही आरोपीस तात्काळ अटक.
दहिवडी पोलीस ठाणे हद्यीत दिनांक २२/०९/२०२३ रोजी सकाळी १०.०० वा चे सुमारांस मौजे मलवडी ता.माण गांवचे हद्दीत त्र्यंबक काळे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मलवडी ता. माण येथील इयत्ता ११ वी मध्ये शिकत असलेली विद्यार्थीनी हिस कर्मवीर भाऊराव पाटिल यांचे १३६ व्या जयंती कार्यक्रमा निमित्त प्रतिमेची मलवडी गांवातुन मिरवणुकी दरम्यान सराईत गुन्हेगार इसम नामे दिपक नामदेव मसुगडे व महेश आप्पा जाधव या दोन इसमांनी मोटार सायकलवरुन येवुन इयत्ता ११ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थीनीची छेड काढुन मारहाण केल्या प्रकरणी माहिती मिळताच, दहिवडी उपविभागातील निर्भया पथक क्रमांक ५ हे तात्काळ सदर ठिकाणी पोहचले व संबंधीत अल्पवयीन मुलगी हिचेकडुन घडलेल्या घटनेबाबत माहिती घेवुन तिस दहिवडी पोलीस ठाणे येथे आणुन तिची तक्रार नोंदवुन घेण्यात आली. त्याप्रमाणे दहिवडी पोलीस ठाणे गुरनं७४७/२०२३ भादंविस क ३५४,३५४(अ),३५४(ड),३२३,५०४,३४ बालकांचे लैगिंक अपरांधापासुन संरक्षण कायदा २०१२ चे कलम ८,१२ प्रमाणे आरोपी दिपक नामदेव मसुगडे व महेश आप्पा जाधव दोन्ही रा.मलवडी ता.माण याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील दोन्ही आरोपी यांना तात्काळ अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि सोनवणे दहिवडी पोलीस ठाणे हे करीत आहेत.सदरची कारवाई ही अश्विनी शेंडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग कॅम्प
वडूज यांचे मार्गदर्शनाखाली मपोउनि स्वाती धोंगडे दहिवडी पोलीस ठाणे, पोकॉ २३७९ चंदनशिवे, पोकॉ २३५१ वसव, पोकॉ १८८२ पोळ यांनी केली आहे.