बुद्धिबळ स्पर्धेत संभुखेड प्राथमिक शाळेचा डंका

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
      सातारा जिल्हा क्रिडा स्पर्धा अंतर्गत माण तालुकास्तरीय शालेय बुद्धीबळ स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संभूखेड शाळेने घवघवीत यश मिळवून जिल्हा स्तरापर्यंत झेप घेतली.
सातारा जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मेरी माता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,म्हसवड येथे  माण तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या थाटामाटात संपन्न झाल्या.या स्पर्धेमध्ये 14,17 व 19 वर्षे वयोगटांमध्ये एकूण 150 पेक्षाही जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
बुद्धीबळ खेळाचे कोणतेही बॅक ग्राउंड नसताना संभुखेड सारख्या खेडेगावातील १४ वर्षा खालील मुलगा यश बापू काटे प्रथम क्रमांक मिळवून, श्रेया हरिदास काटे प्रथम क्रमांक मिळवून तसेच आरती बाबा गायकवाड चतुर्थ क्रमांक मिळवून व माहेश्र्वरी संतोष काटे पाचवा क्रमांक मिळवून जिल्हा स्तरावर पोहचले. एकाच शाळेतील चार मुले जिल्हा स्तरावर पोहचले.  शंभुखेड शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल  म्हसवड नगरपालिकेचे मा.नगराध्यक्ष नितीनशेठ दोशी  माण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी पिसे साहेब, केंद्र प्रमुख पवार साहेब, ग्रामस्थ मंडळ संभुखेड यांनी मुलांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मुख्याध्यापक विजयकुमार ननावरे, शुभांगी कथले, विनायक सावंत, रणजित दराडे या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!