एस टी स्टॅंडचे काम जोपर्यंत सुरु होत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही : अजिनाथ केवटे आंदोलनाचा आज पाचवा दिवस
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
म्हसवड एस.टी स्टँड चे रखडलेले अर्धवट बांधकाम पूर्ण करावे यासाठी अजिनाथ लक्ष्मण केवटे -( रिपब्लीकन सेना माण तालुका अध्यक्ष) यांनी म्हसवड एस टी स्टॅंडजवळ सुरु केलेल्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून शहरातील अनेक मान्यवरांनी आंदोलन स्थळी भेटी देऊन आपला पाठींबा दिला आहे
माण तालुक्यातील सर्वात मोठे व एकमेव नगरपालीका असणारे म्हसवड शहर असून या ठिकाणी प्रसिद्ध व जागृत श्री सिद्धनाथ देवस्थान असून या कुलदैवताच्या दर्शनाला महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून लाखो भाविक येत असतात प्रत्येक रविवारी दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते
अशा या नावलौकीक प्राप्त शहरातील एसटी स्टॅंड ची अवस्था अतिशय दयनिय अशी झाली असून प्रवाशांना याठिकाणी कोणत्याही सोई सुविधा उपलब्ध नाहीत जुने बसस्थानक पाडून नविन ईमारत बांधकामास सुरुवात केली मात्र ठेकेदाराने काम अर्धवट ठेवून निघून गेला त्यावेळेपासून जवळपास सात आठ वर्षापासून हे काम तसेच पडून आहे
या अर्धवट बांधकामामुळे यात प्रवाशांना कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही उन्हाळ्यात उन्हात उभे रहावे लागते पावसाळ्यात शालेय येणारे विद्यार्थी व विद्यार्थीनीना व इतर प्रवाशांना चिकलात उभे रहावे लागत आहे , तेथे कोणत्याही प्रकारचा आडोसा नाही गटरीचे पाणी, पावसाचे पाणी साचून दुर्गधी वासामुळे सर्व प्रवाशांचे खुप मोठ्या प्रमाणात हाल होत आहे व त्याची सुंपुर्ण गैरसोय होत आहे. गरीब प्रवाशांना रात्रीची गावी जाण्यास एस. टी नसल्यास त्यांना थांबण्यासाठी जागा नसल्यामुळे त्यांचे फार मोठे हाल होत आहेत. हे अपूर्ण बाधकाम त्वरीत सुरु करण्यात यावे याकरीता अजिनाथ केवटे यांनी १४ ऑगस्ट २०२३ पासून बेमुदत आंदोलन सुरु केले असून आज या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे त्यांच्या या आंदोलनाला सर्व स्थरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून या एसटी स्टॅंडचे प्रत्यक्षात काम जोपर्यंत सुरु होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसल्याचे अजिनाथ केवटे यांनी सांगीतले