भारतीय स्वातंत्र्य दिन सारे जहाँतला सर्वोत्तम दिवस . – सादिक खाटीक*

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
सादिक खाटीक
आटपाडी  ( प्रतिनिधी )
                कोट्यावधी स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रचंड त्याग, समर्पण आणि बलिदानातून मिळालेले भारतीय स्वातंत्र्य असून भारतीय स्वातंत्र्य दिन हा सारे जहाँतला सर्वोत्तम दिवस म्हणूनच शतकानुशतके सर्वमान्य ठरेल, असे  गौरवोदगार राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव  सादिक खाटीक यांनी काढले .
                राजारामबापू  हायस्कुल व ज्यूनियर कॉलेज आटपाडी येथे सादिक खाटीक यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले . असंख्य विद्यार्थी, विद्यार्थीनी यांच्यासह प्रशालेचे मुख्याध्यापक टी. डी . चव्हाण, प्रा . हणमंत चव्हाण, प्रा . स्नेहल बुद्रुक, प्रा . सोनाली चौगुले, प्रा . अश्विनी भगत, प्रा . दीपाली आडसुळ, प्रा . स्वप्नील जाधव, माणिकराव साळुंखे, साहेबराव पाटील, संतोष पाटील, दादासाहेब मोटे, महादेव देवकर, ईर्षाद मुलाणी, आशिष जाधव, मोहन सनदी, सचिन पाटील,  मंगल कोरवी, स्वाती भोसले, अनिल जाधव, सुहास खंदारे, रेश्मा खंदारे इत्यादी अनेक जण उपस्थित होते .
                उद्या दि .१५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्याला ७६ वर्षे पुर्ण होताहेत . या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विविध दैनिकांशी बोलताना सादिक खाटीक हे गौरवोदगार काढले .
                सादिक खाटीक पुढे म्हणाले, हजारो वर्षाची वर्णवर्चस्वाची व्यवस्था, परकीयांची अनेक आक्रमणे, माणसांना, स्त्रियांना मिळणारी हीन दर्जाची वागणूक, होणारे प्रचंड अन्याय,अत्याचार या सर्वांना देशव्यापी मुक्ती देण्याचे काम भारतीय स्वातंत्र्य लढ्यातून केले गेले . जात, पात, धर्म, उच्च, कनिष्ट अशा भेदभावांना दूर ठेवत ,*हर दिल से हमारा नाता है* या एकाच उदात्त प्रेमाच्या, अभेद्य एकतेच्या भावनेने हे स्वातंत्र्याचे उद्दीष्ट साधण्यात आले . हाल, अपेष्टा, अत्याचार, मरणप्राय यातनांना सामोरे गेलेल्या करोडो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग व बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य ही जगातली सर्वोत्तम घटना  होती, आहे व भविष्यातही मानली जाणार आहे .
                आज देशातील लोकशाही, संविधानावर घाला घालण्याचे काम काही शक्ती करीत असून देशाला पुन्हा मनुस्मृतीच्या अधिपत्याखाली आणण्याचे मनसुबे रचत आहेत. देशातील महापुरुष, स्वातंत्रदिन, तिरंगा ध्वज यावरही टीका टिप्पणी करून  देशवासीयांच्या बंधुत्वाच्या भावनेले तडे दिले जात आहे. अशा शक्तींना वेळीच रोखून संविधान व लोकशाहीवर आधारीत देशाचे स्वातंत्र्य आबाधीत राखण्याचे काम प्रत्येक भारतीयांनी जागरुकपणे, डोळसपणे करणे गरजेचे आहे .
                ब्रम्हांडावर अधिराज्य करण्याची स्वप्ने सकारात्मकतेने पाहणारे करोडो भारतीय भविष्यात घडले पाहीजेत . जगातल्या सर्व राष्ट्रांनी स्वयंस्फुर्तीने जगाचे नेतृत्व करण्यासाठी भारताला स्विकारले पाहीजे . असा जगाचा स्वर्ग म्हणून भारताला बनवणे हेच खरे स्वातंत्र्याचे मर्म आहे . त्यासाठी प्रत्येक भारतीयाने समर्पित झाले पाहीजे . असे शेवटी सादिक खाटीक यांनी म्हंटले आहे .

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!