मा.इंजि.श्री सुनील पोरे साहेब यांच्या पाठपुराव्याला यश दिवड हद्दीत अनेक वर्षे रखडलेले नॅशनल हायवे चे काम सुरू
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
मा.आमदार श्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली .इंजि.श्री सुनील पोरे साहेब यांच्या पाठपुराव्याला यश आले असून म्हसवड साखळी पुलाजवळ दिवड हद्दीत बरेच वर्षे रखडलेले नॅशनल हायवे चे काम अखेर आज पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आले.
म्हसवड येथील नॅशनल हायवे चे काम बरेच वर्षे रखडले होते या रस्त्यारुन जाताना येताना गाड्यांचे व प्रवाश्यांचे अतोनात हाल होत होते त्या रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी मा.इंजि.सुनील पोरे साहेबांनी मा आमदार जयकुमार गोरे भाऊ यांचे माध्यमातून वारंवार प्रयत्न केले प्रसंगी दिल्लीत मंत्री महोदय नितीन गडकरी साहेब यांची भेट घेऊन अडचणी कानावर घातल्या प्रयत्न सुरू असताना कॉन्ट्रॅक्टर कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आल्या नंतर 26 जानेवारी 2023 रोजी सदरचे काम त्वरित सुरू करण्यासाठी साहेबांनी उपोषण केले
त्या उपोषणास म्हसवडकरांनी खूप मोठा पाठिंबा दिला होता त्या दिवशी सदर कॉन्ट्रॅक्टर व अधिकारी यांनी सर्व प्रलंबित व रखडलेले काम त्वरित पूर्ण करून देतो असे लिखित आश्वासन दिले होते व नॅशनल हायवे चे काम जलद गतीने सुरू देखील झाले सर्व रस्त्याचे काम पूर्ण झाले असता म्हसवड दिवड हद्दीतील साखळीपुल जवळ काम पुन्हा कायदेशीर प्रक्रियेमुळे रखडले होते त्या कामाचा देखील मा.इंजि.श्री सुनील पोरे साहेबांनी वारंवार पाठपुरावा केला व आज सदरचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे या *कामाची पाहणी व माहिती घेताना इंजि.श्री सुनील पोरे , भाजपा म्हसवड शहराध्यक्ष बी.एम.अब्दागिरे ,पत्रकार पोपटराव बनसोडे , Adv.शुभम पोरे , मेघा इंजीनियरिंग चे PRO श्रीकांत घाडगे ,आदी मान्यवर उपस्थित होते.हे काम सुरु झाल्यामुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून पोरे यांना धन्यवाद देत आहेत