ग्राहकांचे संघटन आणि सजग विद्यार्थी ग्राहक चळवळ देशाला विश्ववंदिता करील— डाॅ.विजय लाड 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
अजितकुमार काटकर
वरकुटे वार्ताहर:
ग्राहकांचे संघटन आणि सजग विद्यार्थी ग्राहक चळवळ देशाला विश्ववंदिता करील असा आशावाद ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्याध्यक्ष डाॅ विजय लाड  यांनी दोन दिवसीय राज्य अधिवेशनाच्या प्रसंगी  केला. जळगाव येथिल जैन हिल्सच्या गांधी तीर्थ मधील कस्तुरबा सभागृहात  ग्राहक पंचायतचे दोन दिवसीय अधिवेशन संपन्न झाले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डाॅ. विजय लाड यांचा जगत्गुरु संत तुकाराम महाराज यांची पगडी, उपरणे आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
विदर्भ प्रांताध्यक्ष शामकांत पाञीकर यांनी ग्राहक चळवळ-समस्या,निवारण,प्रशासकिय निवेदन पद्धती,कर्तव्य आणि जबाबदारी,तदनंतर श्रीमती अॅड. विजेता सिंह  यांनी नवीन,सुधारीत ग्राहक संरक्षण कायदा-२०१९, राज्यसचिव अरुण वाघमारे यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद,कोकण विभागाध्यक्ष प्रा डाॅ सुरेश पाटील यांनी सजग विद्यार्थी ग्राहक प्रबोधन,तर डाॅ प्रसन्नकुमार रेदासनी (जळगांव)यांनी रेड क्राॅस ब्लड बँक यावर मार्गदर्शन केले.२ दिवसात एकुण ११ अभ्यासपुर्ण,माहितीयुक्त सञे झालीत.महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यातुन ३०० साधक उपस्थित होते.
जैन इरिगेशन सिस्टीम्सचे चेअरमन यांनी या अधिवेशनाचे उद्घाटन केले. त्यांचा संघटनेतर्फे पुणेरी पगडी, उपरणे, शाल, स्मृती चिन्ह आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. देशाला समृद्घ करण्यासाठी ग्राहक जागृतीचे काम ग्राहक पंचायत करीत आहे असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
 ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार* नाशिक विभागा तर्फे महेश चावला, .कोकण विभाग तर्फे संदेश तात्या तुळसणकर(वैभववाडी), मराठवाडा छ संभाजीनगर विभाग तर्फे सचिन कवडे तर विदर्भ प्रांत तर्फे शोभा सोनकनवरे  यांना  स्मृतीचिन्ह,मानपञ,शाल  देउन सन्मानित करण्यात आले.तसेच संयोजक जळगांव जिल्हा टिम व  नाशिक विभाग टिमचा सत्कार सोहळा* संपन्न झाला.नाशिक  विभागाध्यक्ष डाॅ अजय सोनवणे,विभाग संघटक संजय शुक्ला,विभाग सचिव प्रा डाॅ ए बी महाजन, विभाग सहसंघटक अॅड सुरेंद्र सोनवणे,विभाग सहसचिव श्रीकांत पाठक, जळगांव जिल्हाध्यक्ष मनोज जैन(पारोळा),जिल्हासंघटक सतिष गढे(यावल),जिल्हासचिव उदय अग्निहोञी,जळगांव तालुकाध्यक्ष व CN डिजीटेकचे महेश चावला,नविन व निरज चावला,अस्धिरोगतज्ञ डाॅ नितिन धांडे,गुरुबक्ष जाधवानी,डाॅ अविनाश सोनगीरकर,मिलिंद मांडळकर,कुरकुरे,जोशी,चि अर्थव संजय शुक्ल,(चौधे-भुसावळ)अॅड समीर शिंदे,प्रशांत देशमुख,परदेशी,(सर्व-नाशिक),श्री रमेश मगरे,अशोक सुर्यवंशी(सर्व तळोदा)…आदींनी उत्तम संयोजक,सुक्ष्म नियोजन केले होते.दोन दिवसीय राज्य अधिवेशनाचे फेसबुक-Live व यु-ट्युब द्वारे ही प्रसारण करण्यात आले.सुञसंचालन ए.बी. महाजन यांनी तर पसायदान सौ. मेधा कुळकर्णी यांनी गाऊन राज्य अधिवेशनाची सांगता झाली.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!