म्हसवड-पुळकोटी रस्त्याची दयनीय अवस्था; असंख्य खड्डे देतायेत अपघाताला निमंत्रण |

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )

म्हसवड 

म्हसवड शहरातुन पुळकोटी, जांभुळणी या सह पुढे सांगली जिल्ह्यात जाणाऱ्या रस्त्यावर सध्या असंख्य खड्डे पडले असुन या खड्डयातुन वाट काढणे हे वाहन चालकांसमोर एकप्रकारे दिव्यच आहे या खड्डयांमुळे यापुर्वी अनेक छोटे- मोठे अपघात झाले आहेत अपघातांमुळे अनेकजण जायबंदीही झाल्याच्या घटना घडत आहेत मात्र याकडे आजवर अधिकाऱ्यानी     या खड्डयांकडे पाट फिरवल्याने अपघातांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

माण तालुका म्हटले की दुष्काळी असे संबोधले जाते या तालुक्याचा तसा विकासही कासवगतीनेच होत आहे त्यामुळे ग्रामीण भागातुन शहराला जोडणारे अनेक रस्त्यांची अवस्था  अत्यंत दैयनिय आहे, म्हसवड शहर हे तसे तालुक्यात सर्वात मोठे व नगरपरिषदेचे अन् मोठ्या बाजारपेठेचे शहर म्हणुन ओळखले जाते याच शहरात सुप्रसिद्ध असे श्री. सिध्दनाथ व माता जोगेश्वरी देवीचे प्राचीन असे हेमाडपंथी मंदिर आहे, या मंदिरात दररोज हजारो भाविकगण देवदर्शनासाठी येत असतात तर तालुक्यातील सर्वाधिक मोठी बाजारपेठही याच शहरात असल्याने परिसरातील व लगतच्या तालुक्यातीलही व्यापारी वर्ग याच शहरात नेहमीच येत आहे, अशातच या शहरात आता मोठ मोठी रुग्णालयेही झाली असल्याने परिसरातुन असंख्य रुग्ण याठिकाणी येत आहेत मात्र रुग्णांना अन् बाजारातुन माल खरेदी करुन जाताना या शहराला जोडणारे रस्तेच ठिकठाक नसल्याने अनेकदा अडचणी येत आहेत. म्हसवड शहरातुन पुळकोटी याठिकाणी जाणासाठी असणाऱ्या रस्त्याची तर अवस्था फारच गंभीर बनली आहे. सध्या या रस्त्यावरील असंख्य खड्डयांमुळे वाहनचालकाला खड्डयांतुन रस्ता शोधावा लागत आहे.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या या रस्त्याकडे या विभागाचे साफ दुर्लक्ष झाल्याने अक्षरशा या रस्त्याची चाळण झाली आहे. पुळकोटी कडुन म्हसवडकडे येणाऱ्या रस्त्याची अवस्था तशी जरा बरी आहे मात्र मेगासिटी पासुन पुढे म्हसवडकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था फार गंभीर बनली आहे, दोन्ही बाजुकडुन सदर रस्त्याची डांबरीकरण झाले आहे मात्र मध्येच सुमारे २०० मिटर च्या रस्त्याचे काम झाले नसल्याने या दोनशे मिटरवरील रस्त्यामध्ये २०० हुन अधिक खड्डे पडले आहेत, हे खड्डे जवळपास पाच ते ६ फुट रुंदीचे असल्याने या महाकाय खड्डयांतुन मार्ग काढणे वाहनचालकाला जिकीरीचे बनले आहे. सध्या माण तालुक्यात पावसाची भुरभुर सुरु आहे अशा भुरभुर पावसानेही हे खड्डे भरत आहेत त्या खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्डयांचा अंदाज येत नाही त्यामुळे अनेकदा वाहनांचे अपघात होवुन वाहन चालक पडुन जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे, विशेषत: दुचाकीस्वाराला तर यातुन मार्गक्रमण करणे म्हणजे एकप्रकारे दिव्य पार करण्याप्रमाणे बनले आहे. रात्री अपरात्री रुग्णाला घेवुन म्हसवडकडे येणार्या वाहनाला ही या खड्डयांचा फटका बसत आहे. त्यामुळे पाऊस मोठा सुरु होण्यापुर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील किमान खड्डे भरण्याचे तरी साहस दाखवावे अशी मागणी या मार्गावरील सर्वच वाहनचालकांनी व नागरीकांनी केली असुन बांधकाम विभागाचे अधिकारी हे खड्डे भरण्याचे औदार्य दाखवतील का ? असा सवाल ही उपस्थित केला जात आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!