म्हसवड पोलीसांनी  एकाच दिवशी तीन ठिकाणी दारु अड्ड्यावर छापे टाकून ४ हजार ६१०रुपयाची दारु जप्त 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड 
म्हसवड- परिसरातील व म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील दारू विक्री बंद करण्यासाठी म्हसवड- पोलीसांनी कंबर कसली असून परिसरातील अवैध धंदे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे काम जोरदारपणे सुरू आहे.त्यानुसार आज म्हसवड पोलीसांनी  एकाच दिवशी तीन ठिकाणी दारु अड्ड्यावर छापे टाकून ४ हजार ६१० रुपयाची दारु जप्त केल्या
याबाबत अधिक माहिती अशी पळशी हद्दी मध्ये बेकायदेशीर दारूची विक्री जोरात सुरू असल्याची माहिती म्हसवड- पोलीस स्टेशनला वारंवार मिळत होती. त्यानुसार   पळशी तालुका माण येथे अजिनाथ पोपट खाडे (वय वर्ष 22 ) हा आपल्या राहत्या घराच्या आडोशाला बेकायदेशीर संत्रा देशी दारू विकत असल्याची माहिती म्हसवड पोलिसांना मिळताच म्हसवड पोलिसांनी या दारू अड्ड्यावर छापा टाकला असता त्याच्याकडे देशी बनावटीच्या संत्रा लेबल असणाऱ्या  ८४० रु किमतीच्या एकूण बारा बाटल्या  जप्त करण्यात आल्या
 यावेळी म्हसवड पोलीस स्टेशनचे हवलदार अनील वाघमोडे यांनी याबाबत म्हसवड- पोलिसात गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे
 हिंगणी येथे १०००/रुपये किंमतीची काढीव हातभट्टी ची दारु पकडली असून तातोबा लक्षमण सरतापे यांना याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे..
धुळदेव या. माण येथील रानवाडा धाब्या शेजारी दारूविक्री अड्डायावर छापा टाकून २७७०/-रुपयाची देशी विदेशी दारुच्या बाटल्या जप्त केले आहे. या प्रकरणी विनायक लोखंडे यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
सदर कार्यवाही ही राजकुमार भुजबळ सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार  देवा खाडे महिला पोलीस हवालदार निता पळे पोलीस नाईक रुपाली फडतरे पोलीस कॉन्स्टेबल  नवनाथ शिरकुळे  अनिल वाघमोडे  सतीश जाधव  सुरज काकडे यांनी केली

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!