अन्यथा कोणत्याही क्षणी मुंबई एस टी महामंडळ कार्यालयाला टाळे ठोकू :डॉ, महादेव कापसे.15 ऑगस्ट पूर्वी म्हसवड बस स्थानकांचे नवीन इमारतीचे काम युद्धपातळीवर सुरू करा
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
15 ऑगस्ट 2023 पूर्वी म्हसवड बस स्थानकांचे नवीन इमारतीचे काम युद्धपातळीवर सुरू न झाल्यास कोणत्याही दिवशी कोणत्याही क्षणी आपले मुंबई कार्यालयावर आक्रमकपणे आंदोलन केले जाईल, याची गंभीर नोंद घेणे बाबतचे निवेदन म्हसवड बस स्थानक बचाव संघर्ष समिती, अध्यक्ष डॉ, महादेव कापसे यांनी मॅनेजिंग डायरेक्टर, शेखर चेन्नेसाहेब, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, मुंबई. यांना दिले आहे
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, मुंबई.यांना दिलेल्या निवेदनात डॉ महादेव कापसे यांनी म्हटले आहे की
म्हसवड बस स्थानक नवीन इमारतीचे काम तातडीने पूर्ण केले पाहिजे, याबाबत म्हसवड स्थान बस स्थानक बचाव संघर्ष समिती ने आपणास गेल्या वर्षी 15 ऑगस्ट 2022 पूर्वी काम चालू करावे. असे निवेदन दिले होते. व त्यावेळेस आंदोलनाचा इशाराही दिलेला होता. परंतु आपण मध्यस्थी करून आपले विभागाने टेंडर काढून काम नऊ महिन्यात चालू करतो. असे सांगितले होते. परंतु अध्याप काम चालू नाही. म्हसवड बस स्थानक हा म्हसवड शहराचा नव्हे तर पूर्ण माण तालुक्याचा आत्मा आहे. म्हसवड ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ, शाळा, कॉलेजेस, कोर्ट, महसूल विभाग, पोलीस स्टेशन, व सर्वात मोठे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळ सिद्धनाथ मंदिर असल्याने दररोज हजारो भाविक व कामानिमित्त नागरिक ये जा करीत असतात. त्यामुळे, येथे बस स्थानकाची अध्याधुनिक इमारत आवश्यक असताना या म्हसवड बस स्थानकाने स्मशानभूमीचे रौद्र रूप धारण केले आहे. म्हणून हे काम 15 ऑगस्ट 2023 पर्यंत तातडीने काम सुरू करा. अन्यथा 15 ऑगस्ट 2023 नंतर कोणत्याही दिवशी व कोणत्याही क्षणी मुंबई कार्यालयावर आमची म्हसवड बस स्थानक बचाव संघर्ष समिती, अध्यक्ष डॉ, महादेव कापसे. सदस्य राहुल मंगरुळे, सुरेश उबाळे, प्रसाद माने, महेश सराटे, अजितराव केवटे, अमित कुलकर्णी, सागर शिंदे, लखन मंडले, आनंद बाबर, पोपटराव काळेल, आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित राहून आपणासह आपले कार्यालयावर येऊन टाळे ठोकू.याची आपण व शासनाने गंभीर नोंद घ्यावी. ही आपणास नम्र विनंती. आपले नम्र डॉ, महादेव कापसे. अध्यक्ष, म्हसवड बस स्थानक बचाव संघर्ष समिती, म्हसवड. व संस्थापक, अध्यक्ष, अध्यक्ष, कृष्णा खोरे पाणी संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य.
या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य. परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य. जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा. पोलीस अधीक्षक, सातारा. उपजिल्हाधिकारी कार्यालय, दहिवडी. तहसीलदार कार्यालय, दहिवडी. पोलीस निरीक्षक, म्हसवड. यांना देण्यात आल्या आहेत