पिंगळी विद्यालयाची स्वरा बोराटे जिल्हा गुणवत्ता यादीत!
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
विठ्ठल काटकर
कुकुडवाड/वार्ताहर
माण तालुक्यातील कै आबासाहेब पोळ शिक्षण सौस्थेच्या जय भवानी विद्यालय पिंगळी येथील विद्यार्थिनी स्वरा बोराटे शिषवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत चमकली असून तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी स्वरा बोराटे ही पिंगळी विद्यालयात इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत असून शिषवृत्ती परीक्षेत ३०० पैकी २६५ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत चमकली आहे.तर राज्यस्तरीय मंथन परीक्षेत स्वराने मेडल मिळविले आहे.स्वराचे आई वडील शिक्षक आहेत.तर वर्गशिक्षिका उज्वला पवार मॅडम व काळेल सर यांचे स्वराला मार्गदर्शन लाभले आहे.
शिषवृत्ती व मंथन परीक्षेतील यशाबद्दल कै आबासाहेब पोळ शिक्षण सौस्थेचे विश्वस्त व मार्गदर्शक डॉ. संदिपदादा पोळ, मनोजदादा पोळ, पिंगळी ग्रामस्थ, शिक्षण प्रेमी, विद्यालयाचे मुख्याध्यापक बनसोडे सर यांनी स्वराचे अभिनंदन केले तर सर्व स्तरातून तीचे कौतुक होत आहे.