श्री संत सावता माळी पुण्यतिथी म्हसवड मध्ये मोठ्या उत्साहात साजरी
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
श्री संत सावता माळी पुण्यतिथी निमित्त रविवार दिनांक 16 -7- 2023 रोजी संत सावता माळी यांच्या प्रतिमेची प्रतिमेस पुष्प वृष्ठी करून सायंकाळी सात वाजेपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली
त्यामध्ये गजी नृत्य ढोल ताशा पथक चे नियोजन केले होते मिरवणुकीमध्ये माळी समाज वरचा पार, लिंगे माळी गल्ली, लांब मळा, कबीर वस्ती, झपाटे मळा, कोल्हे वस्ती, डावकरे मळा, खरा मळा, पानमळा इत्यादी सर्व लिंगे समाज बांधव मोठ्या संखेने मिरवणुकीत सहभागी झाला होता त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते अशा पद्धतीने संत सावता माळी यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
या कार्यक्रमाचे आयोजन संत सावतामाळी उत्सव समिती माळी समाज लिंगे समाज बांधव म्हसवड ता. माण जि.सातारा यांचे तर्फे करण्यात आले होते कार्यक्रम पार पाडण्यासाठी सतिश केवटे, शिवदास केवटे, प्रभाकर लांब, भारत लांब महादेव झपाटे , श्रीरंग लिंगे , बापूसाहेब कबीर, शिवाजी झपाटे, महादेव लिंगे , दादा लिंगे, सचिन लिंगे, पंकज केवटे, पिंटू लिगे, अशोक लांब
विजय लिंगे , विकास इंकुळे, हरी कोल्हे , बाळू लिंगे यांनी परीश्ररम घेतले.