सुळेवाडी ता माळशिरस येथील व्यक्तीची म्हसवड  मध्ये विषारी औषध  पिऊन आत्महत्या 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड(संपादक:अहमद मुल्ला)
म्हसवड 
निखील शंकर सुळे वय 31 वर्षे रा.सुळेवाडी ता.माळशिरस जि.सोलापुर याने म्हसवड येथे रहात असलेल्या भाडोत्री खोलीत विषारी औषध पिऊन आत्महत्या केली असल्याचे दिसून आले असून मृत्युचे कारण अद्याप समजू शकले नाही  अकस्मीत मृत्यु अशी नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात करण्यात आली 
या घटने बाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहीती अशी
 :-दिनांक 14/07/2023 रोजी रात्री 8:00 वा.चे सुमारास मौजे म्हसवड ता .माण गावचे हद्दीत शिक्षक कॉलनी येथील तानाजी शिवाजी सावंत यांचे मालकीची तीन माळ्याचे बिल्डिंग मधील पहिल्या माळ्यावरील रुम नं 5 मध्ये निखील शंकर सुळे वय 31 वर्षे रा.सुळेवाडी ता.माळशिरस जि.सोलापुर हा राहत असले घरात उताने स्थितीत तोंडातुन फेस येत असताना मिळुन आल्याने त्यास उपचाराकरिता गलंडे हॉस्पिटल म्हसवड येथे नेहले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासुन पुढील उपचाराकरिता सरकारी दवाखाना येथे घेवुन जा असे सांगितल्याने त्यास प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवड येथे उपचाराकरिता घेवुन गेले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासुन उपचारापुर्वी मयत झाला असल्याचे सांगितले.  तरी तो कोणतेतरी विषारी औषध पिवुन मयत झाला असावा तरी सदर मयतेचा तपास व्हावा.म्हणून ची खबर सुखदेव सावंत यांनी दिली असू म्हसवड पोलीसांनी अकस्मीत मृत्युची नोंद केली असून अधिक तपास स पो नि राजकुमार भूजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो ह एस एस जाधव करत आहेत

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!