म्हसवड येथील धोकादायक खाणीच्या संरक्षक भिंतीचे पुढे काय? : प्रा. विश्वंभर बाबर

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक अहमद मुल्ला )
      म्हसवड… प्रतिनिधी
   म्हसवड शहरात मुख्य रस्ता लगत भला मोठा खाणीचा खंदक  असून प्रवासी व रहिवासी यांच्या दृष्टीने  ही बाब धोकादायक असल्याने तिच्या संरक्षक भिंतीचे पुढे काय  ?   असा सवाल किसान काँग्रेसचे पुणे विभागीय उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा.विश्वंभर बाबर यांनी केला आहे.
       म्हसवड शहरामध्ये सातारा पंढरपूर हायवे लगत सिद्धनाथ हायस्कूलच्या शेजारी भली मोठी खंदक वजा खाण आहे. सदर खाण या परिसरातील म्हसवड वासियांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रचंड धोकादायक बनलेली आहे. याबरोबरच सातारा पंढरपूर रस्त्याचे नव्याने बांधकाम झाल्याने सदर खाण प्रवाशाच्या दृष्टीने जीवघेणी बनलेली आहे .रस्ते विकास महामंडळ पुणे यांनी या रस्त्याचे काम नुकतेच केले,अनेक ठिकाणी रस्ता अपुराही आहे,. खाणीच्या ठिकाणी जागा असताना सुद्धा ठेकेदाराने अपुऱ्या रुंदीचा रस्ता केलेला आहे,याबाबतही ना नगरपालिकेचे लक्ष, ना  स्थानिक पदाधिकारी व नेतेमंडळीचे लक्ष ही वस्तुस्थिती आहे. ठेकेदाराने धोकादायक व आरोग्यदायी कारणासाठी या रस्त्यालगत गटार यंत्रणा व संरक्षण अथवा तत्सम यंत्रणा असणे अपेक्षित असताना  सदर ठिकाणी कोणतीही संरक्षण सुविधा केलेली नाही.त्यामुळे सदर ठिकाण प्रवासी व वाहनधारकासाठी मृत्यूचा सापळा बनलेला आहे ,आजवर या ठिकाणी अनेकांचे खाणीत पडून जीव गेलेले आहेत. या परिसरात तळीरामांचा  सुळसुळाट असल्याने ही खाण अनेकांसाठी जीवघेणी ठरणारी असल्याने सदर ठिकाणी टकलादु पत्रा लावण्या ऐवजी पक्का बांधकाम कठडा अथवा मजबूत संरक्षक भिंत होणे गरजेचे आहे.वाईट प्रसंगाच्या माध्यमातून काही घडल्यास अनेकांचा जीव जाण्याची भीती असल्याचे प्रा. बाबर यांनी सांगितले. सातारा पंढरपूर रस्त्यावर अनेक ठिकाणी, घाटात व वळणावर पत्र्याचे संरक्षण कवच बसवलेले आहे.मात्र या खाणी जवळ नव्याने काहीही केलेले नसल्याने प्रवासी,रहिवासी,व नजीकच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही खाण धोक्याची घंटा ठरत आहे.
     मागील  कालावधी मध्ये सदर खाणीच्या ठिकाणी सुधारणा करण्याची योजना म्हसवड नगरपालिकेने मंजूर केली होती,मात्र वेळेत काम न झाल्याने मंजूर झालेला मोठ्या रकमेचा निधी परत गेल्याने आता या बाबीकडे लक्ष देण्यासाठी लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकांना वेळ नाही ही वस्तुस्थिती दिसत आहे. खाणीच्या जागेवर सुधारणा होईल तेव्हा होईल मात्र प्रवासी व रहिवाशाच्या दृष्टीने या ठिकाणी संरक्षक भिंत अथवा तसम मजबूत सुविधा तातडीने व्हावी अशी मागणी प्रा. विश्वभर बाबर यांनी केली आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!