राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वतीने वडूज येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
म्हसवड
मा मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत माण खटाव विधानसभा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वडूज येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरात मा मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी राज्यात वाढत चाललेली महागाई राज्यातील राजकीय घडामोडी यांवर मार्ग दर्शन केले यावेळी प्रशिक्षण देण्यासाठी आलेले निरज जैन स्नेहल बाळकृष्ण शुभांगी यांनी आर एस एस व BJP लोकांना मुस्लिम राजानी देशाची कशी लुट केली, जातीवाद आशा प्रकार चे चुकीचे माहिती हे सरकार लोकांना सागत आहे यातील सत्य काय आहे व ते लोकांना कशा प्रकारे सांगायचे हे समजून सांगितले स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेस चे योगदान यांची माहिती सांगितली
यावेळी रणजीत भैय्या देशमुख अध्यक्ष हरनाई सुत गिरणी, राजेंद्र अप्पा शेलार, डॉ सुरेश जाधव काँग्रेस जिल्हाध्यक्ष, झाकीर भाई पठाण अल्प संख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष, अमरजित कांबळे, बाबासाहेब माने , डॉ संतोष गोडसे ,शिवाजी राव यादव, विश्वंभर बाबर सर, किसनराव काळेल, राजुभाई मुलानी, गबबारभाई काझी, बाळासाहेब आटपाडकर, सदाशिव पाटील ,बाबासाहेब बनसोडे, विजय बनसोडे ,साहिल तांबोळी, सुनिता महेश गुरव, शारधा कसबे, पुष्पा काळेल, अनुष्का गुरव, व माण खटाव तालुक्यातील सर्व प्रशिक्षणार्थी बहु संख्येने उपस्थित होते