महाराष्ट्र राज्य शिंपी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापना करण्याची उपमुख्य मंत्र्याकडे मागणी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
म्हसवड(प्रतिनिधी)
     महाराष्ट्र राज्य शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावे  अशी मागणी  समस्त  शिंपी समाजाच्या वतीने नामदेव समाजोन्नोती  परिषद सातारा जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील श्रीधर पोरे यांनी उपमुख्यमंत्री ना. देवेन्द्र फडणवीस यांचेकडे केली.
         महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यात सुमारे ६५ लक्ष इतक्या संख्येने विविध पोट जातीत शिंपी समाज महाराष्ट्रात असुन बहुतेक समाजातील मंडळी ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. शिंपी समाज हा प्रामाणिकपणाने आपले पारंपरिक कापड व शिलाईचा व्यवसाय करीत आहेत. तथापि आर्थिक पाठबळाची अत्यंत आवश्यकता भासत आहे. समाजातील सर्व बांधवांच्या वतीने राज्य शासनास नम्र विनंती की इतर समाजाच्या विकासासाठी ज्या धर्तीवर आर्थिक विकास महामंडळे स्थापन केली आहेत त्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी असे  इंजि. सुनील श्रीधर पोरे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे  बाबतचे निवेदन समस्त शिंपी समाजाच्या वतीने नामदेव समाजोन्नोती  परिषद सातारा जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील श्रीधर पोरे यांनी दिले. यावेळी माण खटाव चे आमदार जयकुमार गोरे, पत्रकार सुजित आंबेकर, भाजप ओबीसी युवक प्रदेशाध्यक्ष करण भैय्या पोरे,  युवा नेते सिध्दार्थ गुंडगे, नामदेव चांडवले यांचेसह संत नामदेव शिंपी समाजबाधव उपस्थित होते.
– फोटो
ना.देवेन्द्र फडणवीस यांना निवेदन देऊन् चर्चा करताना सुनिल पोरे, आ. जयकुमार गोरे व इतर

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!