अजिनाथ लक्ष्मण केवटे यांचा म्हसवड नगरपालिकेसमोर उपोषणाचा आज चौथा दिवस प्रशासनाचे दुर्लक्ष
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
म्हसवड
म्हसवड मधील चांदणीचौक ते शिक्षक कॉलनी (नागोबा कॉम्लेक्स समोर ) येथील गटारीचे अर्धवट काम पुर्ण न केल्याने रिपब्लिकन सेना माण तालुका अध्यक्ष अजिनाथ लक्ष्मण केवटे यांनी नगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी स्टेज व माईक लावुन नगरपालिकेसमोर सुरु केलेल्या बेमुदत आंदोलनाचा आज चौथा दिवस दिवस असून नगरपालीका प्रशासनाने त्याची अद्याप दखल घेतली नाही
म्हसवड मधील चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी रस्त्यालगत भुयारी गटार मंजूर केले आणि कामे अपूर्ण असताना त्यांचे बिले देण्यात आली का . या गटारीचे काम अर्धवट सोडून दिले आहे या भुयारी गटार व उघडयावर असलेल्या गटारीची साफसफाई कसल्याही प्रकारे केली जात नाही.ज्याठिकाणी काम अर्धवट सोडले आहे त्याठिकाणी संपूर्ण शिक्षक कॉलनीचे पाणी येऊन मोठ्या खड्ड्यात साचले असून त्यामुळे तेथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे सगळीकडे त्या घाण पाण्याची दुर्गंधी पसरली असून अनेक अबालवृद्ध आजारी पडले आहेत गटारीचे जेवढे काम झाले आहे त्यात घाण साठून जागोजागी ते घाण पाणी रस्त्यावर पसरले आहे या रस्त्यावर तीन शाळा कॉलैज आहे या रस्त्यावरुन जाता येता या घाण पाण्याचे सिंतोडे अंगावर उडत आहेत या बाबत अनेक वेळा तक्रारी देऊन देखील प्रशासन जाणीवपूर्व दुर्लक्ष करत आहे
आता पावसाळयाचे दिवस आले आहेत. काही ठिकाणी गटार पुर्ण मातीने भरलेली आहे. . तेथील गटारी लगत मोठ मोठी डबरी पडलेली आहेत. घाण पाण्याला जाण्यासाठी मार्ग नाही. तेथे सांडपाणी, संडासचे पाणी, पाऊसाचे पाणी, अंघोळीचे पाणी एकत्र मिक्स होत असल्याने दुर्गंध पसरत आहे साठलेल्या पाण्यामुळे डासाचे प्रमाण वाढले आहे. लहान मोठी माणसे आजारी पडत आहेत. जेथे डबरी आहेत. तेथेच पिण्याच्या पाण्याच्या पाईपा आहेत त्यात हे घाण पाणी जात असण्याची देखिल शक्यता आहे. याबाबत नागरीकांनी वारंवार तक्रारी देऊन देखील दखल घेतली जात नाही म्हणून शेवटी उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागला असल्याचे रिपब्लिकन सेना माण तालुका अध्यक्ष अजिनाथ लक्ष्मण केवटे यांनी सांगीतले