सामाजिक सलोखा राखण्यात इफ्तार पार्टीची मोठी मदत : प्रभाकर देशमुख
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून, उपवास सोडण्यासाठी म्हसवड मधिल काझी गल्ली येथे रोजा इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पाडली. या कार्यक्रमाचे आयोजन माण -खटाव राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांचे वतीने करण्यात आले होते.
येथिल काझी गल्ली येथे गुरुवार (दि.२०) सायंकाळी सात वाजता इफ्तार पार्टी झाली. यावेळी या कार्यक्रमास शुभेच्छा देताना माण -खटाव राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते माजी आयुक्त प्रभाकर देशमुख म्हणाले की, सामाजिक सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील लोक एकत्र येणे आवश्यक आहे. सर्व धर्मांमध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसांतील बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन होणेसुद्धा महत्त्वाचे आहे. दोन समाज एकत्र आल्याने मतभेद दूर होऊन बंधुत्त्व भावना वाढीस लागण्यास मदत होणार आहे. अशा सणांमुळे हिंदू-मुस्लिम बांधव मनापासून एकत्र येतात. सामाजिक सलोखा राखण्यात इफ्तार पार्टीची मोठी मदत हो असून त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते. आपण सर्व एक आहोत ही भावना वृद्धिंगत होण्यासाठी रोजा इफ्तार पार्टी महत्त्वाची आहे.सर्वजण एकत्रित येऊन एकमेकांच्या सणावारामध्ये सहभागी होऊन शुभेच्छा देत असतो हा बंधुभाव असाच टिकला पाहिजे आज आपल्या देशात समता एकता अखंडता बंधुता सामाजिक सलोखा राखण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी गावातील समस्त हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी इफ्तार पार्टीचा आस्वाद व आनंद घेतला मुस्लिम बांधवांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी देशमख यांनी शहरातील सर्व मशिदीमध्ये जावुन उपवासकर्त्यांना खजुर चे वाटप केले तर भगवानगल्ली येथे आयोजीत केलेल्या इफ्तार पार्टीत सहभागी सर्व मुस्लिम समाजबांधवांना स्वत: जेवन वाढले तत्पुर्वी देशमुख यांनी येथील मुस्लिम समाजबांधवांसोबत शहरातील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार प्रदान केला यावेळी छ. शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी मुस्लिम समाजबांधवांनी परिसर दणाणुन सोडला यावेळी माजी नगराध्यक्ष विलासराव माने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे, अँड. पृथ्वीराज राजेमाने, तेजसिंह राजेमाने, परेश व्होरा, चंद्रकांत केवटे, अजित केवटे सचिन लोखंडे, अँड. निसार काझी, फारूक काझी, युवा उद्योजक सद्दाम काझी, सलीम काझी, मोहसिन तांबोळी, अजिम तांबोळी, फैयाज तांबोळी, मकसुद तांबोळी, जहांगिर तांबोळी, शाहजान मुल्ला, सलीम शेख, सिकंदर मुजावर, मुन्ना काझी, गब्बार काझी, तैय्यब काझी, शौकत मुल्ला, शौकत शेख, हबीबभाई काझी, आयुब शेख, सैफन मुजावर, दस्तगिर मुल्ला ,रियाज काझी, दस्तगीर मुजावर ,जमीर महमंद मुजावर, झाकीर मुजावर इ. बहुसंख्य हिंदू व मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते.