भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न,बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त म्हसवड मध्ये भव्य मिरवणुक; हजारो भिम अनुयायी सहभागी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक अहमद मुल्ला )
म्हसवड   /प्रतिनिधी :
    –भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न,बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या   १३२व्या जयंती निमित्त काढलेल्या भव्य मिरवणुकीत हजारो भिम अनुयायी सहभागी होते यावेळी  डॉ बाबासाहेब आंबेडकर,गौतम बुद्ध, छ शिवाजी महाराज महात्मा फुले, आण्णाभाऊ साठे राजे उमाजी नाईक संत बश्वेश्वर यांच्या जयघोषात परिसर दणाणून सोडला तर डीजेच्या तालावर     तरुणाईने ठेका धरला होता हालगी, घुमक्याच्या व महिलांच्या लेझीम पहाण्यासाठी मोठी गर्दी झाली होती तब्बल साडेतीन तास सुरू असलेली मिरवणूक रात्री आकरा वाजता समाप्त झाली या मिरवणुकीस विशेष सहकार्य लाभले ते नुतन डिवाय एसपी काकडे, म्हसवड पोलीस व दंगा काबु पथक यांनी चौख बंदोबस्त ठेवला होता सुरुवातीपासून शेवटपर्यंत मिरवणुकीत दोन ते अडीच हजार भिम सैनिकांच्या उपस्थितीत मिरवणूक उत्साहात संपन्न झाली
भारतीय घटनेचे शिल्पकार , भारतरत्न प. पू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने म्हसवड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे सकाळी ९ वाजता पंचशील ध्वजारोहण माजी नगराध्यक्ष वैशाली लोखंडे यांचे हस्ते करण्यात आले त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी त्रिशरण पंचशील बौध्दाचार्य कुमार सरतापे यांनी म्हटले तर सुत्रसंचालक राजाराम तोरणे यांनी केले यावेळी इंजि. सुनील पोरे यांनी पांचगणी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक दिवस वास्तव्य केलेल्या घराला भेट दिली आसता आज हि बाबासाहेब ज्या खुर्चीत बसून अभ्यास करायचे तो टेबल व खुर्ची पेन आदी वस्तू आज हि बाबासाहेब साहेबांच्या आठवणी ताज्या करतात असा  अनेक आठवणी सुनील पोरे यांंनी सांगीतल्या तर यावेळी आदित्य लोखंडे, रोहण लोखंडे, यश धाईजे, शरण्या सरतापे, राजरत्न सरतापे आदी मुलांनी भाषणे केली
  दुपारी दोन वाजता महिलांच्या फनिगेम स्पर्धा घेण्यात आल्या सांयकाळी पाच वाजता सजवलेल्या रथामध्ये मधून मिरवणुकीला सुरुत करताच वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मिरवणूक थांबवण्यात आली सांयकाळी पाऊस उघडल्यानंतर मिरवणूकीस सुरुत झाली डॉ आंबेडकर रोड वरुन मिरवणूक सातारा पंढरपूर रोडवर जात असताना महात्मा फुले नगर मधील  महिलांनी मिरवणुकीच्या वाटेवर सडा रांगोळी काढून पुतळ्याना पुष्पहार अर्पण केले त्यानंतर बसस्थानक चौकात मिरवणूक येताच म्हसवड राष्ट्रवादी तर्फे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली या आतिषबाजी मध्येच राष्ट्रवादीचे माण खटावचेने नेते प्रभाकर देशमुख यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जयघोष करण्यात आला यावेळी किशोर सोनवणे, दिलिप तुपे, परेश व्होरा, विलास रुपनवर, तेजसिंह राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, राहुल म्हेत्रे, सचिन लोखंडे, काशिनाथ रुपनवर, चंद्रकांत केवटे, अशोक पिसे, आदीनी उपस्थित होते
यावेळी माजी नगराध्यक्ष विजय धट, रामचंद्र गुरव, लुनेश विरकर, सलाऊद्दीन काझी, फारुख काझी, शिक्षक बॅकेचे संचालक विजय बनसोडे सौ बनसोडे मॅडम, आदीनी बस्थानक जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील अभिवादन केले मिरवणूक महात्मा फुले चौकात आल्यावर रात्री साडे आठ वाजता आ गोरे यांनी अभिवादन केले  छ शिवाजी महाराज चौकात प्रहार संघटनेचे माण खटावचे अरविंद पिसे यांनी पुष्पहार अर्पण केले तर राजवाडा चौकात राजेमाने परिवारानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले
    जयंती उत्सव मिरवणुकीत म्हसवड व परिसरातील बारा वाड्या बारा वस्त्या  वरील आणि शहरातील दोन ते अडीच हजार भिमसागर मिरवणुकीत उसळला होता प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे जुन्या रूढी, परंपरा हद्दपार करून इतिहास रचणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे लोकशाहीचे अशा या महामानवाच्या जयंतीदिनिमित्त मिरवणुकीत अनेकांनी डॉ बाबासाहेब   आंबेडकर यांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या तर डॉ बाबासाहेब आंबेडकर  सांस्कृतिक भवन येथे  जाऊन डॉ. आंबेडकरांना यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!