आम.जयाभाऊ गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली इंजि सुनील पोरे यांच्या प्रयत्नाना यश म्हसवड बसस्थानकाच्या कामास गती
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
इंजि सुनील पोरे यांनी आम. जयकुमार गोरे याच्या माध्यमातून म्हसवड बसस्थानक बांधकाम सुरु होण्यासंदर्भात केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन परिवहन महामंडळाने म्हसवड बसस्थानकाच्या रखडलेल्या उर्वरीत कामासाठी सुमारे १ कोटी ५६ लाख रुपए किमतीची निवीदा काढली व बसस्थानक बांधकामाला गती मिळाली
म्हसवड शहराचा विकास हाच ध्यास कायम उराशी बाळगुन शहराच्या सर्वांगीन विकासासाठी कायम धडपडत असलेले सामाजिक कार्यकर्ते इंजि सुनील पोरे यांनी आजपर्यंत म्हसवड शहरातील जनतेच्या हितासाठी अनेक आंदोलने केली व ती यशस्वी करुन दाखवली मग ते पुराचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला मिळण्यासाठी केलेले आंदोलन असो की म्हसवड शहरातून जाणारा फोरलेन हायवेचे साखळी पूल ते पिलीव घाटापर्यंतचा रस्त्याचे बरीच वर्षे थाबलेले काम सुरु करण्यासाठी २६ जानवारी रोजी केलेले आंदोलन असो आम. जयकुमार गोरेभाऊ यांच्या माध्यमातून व मार्गदर्शनातून ही आंदोलने यशस्वी केली आणी २६ जानेवारी रोजीच म्हसवड बसस्थानकाचे रखडलेले काम सुरु करण्याविषयी परिवहन मंडळाला आदोलनाचा इशारा दिला होता .
म्हसवड बसस्थानकाच्या रखडलेल्या कामा संदर्भात परिवहन महामंडळाला आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर तातडीने दखल घेऊन बसस्थानकाच्या उर्वरीत कामासाठी सुमारे १ कोटी ५६ लाख रुपयाचे राज्य परिवहन महामंडळ बांधकाम विभाग पूणे यांनी टेंडर काढले आणी मेल द्वारे इंजि.पोरे यांना पाठवून दिले असल्यामुळे सुनील पोरे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून १० वर्षापासून रखडलेला बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लागला आहे
म्हसवड शहर हे सातारा व सोलापुर जिल्ह्याच्या सिमेवर असलेले महत्वाचे शहर आहे, याच शहरात लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री. सिध्दनाथाचे भव्य असे मंदिर आहे, तर याच शहरात १८५७ च्या काळातील सर्वात जुनी अशी नगरपरिषदही आहे. तर संपूर्ण माण तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठही याच शहरात आहे, माण तालुक्याचे संपूर्ण राजकारणही याच शहरावर अवलंबुन आहे अशा महत्वपुर्ण शहरातील बसस्थानकाची सध्या फार मोठी दुर्दशा झाली आहे. गत १० वर्षापासुन या बसस्थानकाचे काम रखडले असल्याने येथील प्रवासी नागरीकांची प्रचंड गैरसोय होत आहे, महिला प्रवाशांची तर फार मोठी गैरसोय याठिकाणी होत असुन समस्येंचे आगार बनलेल्या या बसस्थानकात आता एस.टी.. ही मुक्कामी थांबत नसल्याची वस्तुस्थिती आहे. याबाबत यापुर्वी अनेकांनी अनेकदा एस. टी. प्रशासनाकडे निवेदनेही दिली मात्र त्या सर्वांची फक्त बोळवण करण्याचे काम एस. टी. च्या अधिकाऱ्यांनी केल्याची वस्तुस्थिती आहे.
म्हसवड बसस्थानक हे दहा वर्षापासून शहरातील चर्चेचा विषय बनले होते . बसस्थानकाची दुर्दशा पाहुन इंजि सुनील पोरे यानी राज्य परिवहन मंडळाला निवेदन दिले होते निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता तसेच आम. जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संबधित परिवहन मंत्री महोदय यांचेकडेही पाठपुरावा केला होता याची दखल घेत नुकतेच परिवहन महामंडळाने टेंडर काढले असून म्हसवड बसस्थानकाच्या रखडलेल्या उर्वरीत कामासाठी सुमारे १ कोटी ५६ लाख रुपए किमतीची निवीदा काढली आहे अखेर इंजि सुनील पोरे यांच्या लढ्याला यश आल्याची चर्चा म्हसवडकर जनतेतून सुरु आहे लवकरच १० वर्ष रखलेल्या बसस्थानकाच्या कामास सरुवात होणार हे निश्चित आहे व म्हसवड बसस्थानकाची भव्य ईमारत म्हसवडच्या वैभवात भर घालणार यात अजिबात शंका नाही